हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आधार कार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. आपल्याला कोणत्याही कामांसाठी आधार कार्डची गरज असते. विविध सरकारी बँकांपासून ते मोबाईल फोन घ्यायचा असेल किंवा सिम कार्ड जरी घ्यायचे असेल तर आपल्याला आधार कार्ड दाखवावे लागते. परंतु आजकाल आधार कार्डशी जोडलेल्या अनेक गोष्टींमुळे फ्रॉड देखील होत आहे.
एकाचे आधार कार्ड दुसराच व्यक्ती वापरत असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. त्यामुळे तुमचे आधार कार्ड दुसरा कोणताही व्यक्ती वापरत नाही ना?हे तुम्ही आता घरबसल्या तपासू शकता. जेणेकरून तुमचे होणारे नुकसान देखील वाचेल. तुमच्या आधार कार्ड दुसरा कोणता व्यक्ती वापरत आहे की नाही हे तुम्ही तपासून शकता. तुम्ही तुमच्या आधार कार्डचा वापर याआधी प्रवास, हॉटेल, मुक्काम, बँकिंग यासारख्या अनेक ठिकाणी कुठे केला आहे हे तुम्ही तपासू शकता.
- यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी माय आधार या पोर्टलवर जावे लागेल.
- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक कॅपच्या कोड इंटर करा आणि ओटीपी सहल लॉगिन या बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाका.
- त्यानंतर तुम्ही ऑथेंटीकेशन हिस्ट्री हा पर्याय निवडा आणि या कालावधीचे पुनरलोकन करायचे आहे तो कालावधी तारीख निवडा.
- यामध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर याआधी कोणत्या ठिकाणी वापरला आहे ही सविस्तर माहिती जर तुम्हाला कोणती अपरिचित संशयास्पद माहिती आढळली तर तुम्ही १९४७ या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा.
- तुमच्या तक्रारीचा ईमेल: [email protected] वर पाठवू शकता.
अशाप्रकारे तुम्ही वरील स्टेप्स फॉलो करून तुमच्या आधार कार्ड इतर कोणत्या ठिकाणी वापरले गेले आहेत. हे तपासू शकतात. तसेच जर तुम्हाला कोणतीही संशयास्पद माहिती आढळली तर तुम्ही मदत घेऊन तक्रार देखील करू शकता.