बुल मार्केट, बेअर मार्केट यासह स्टॉक मार्केटमध्ये दररोज वापरल्या जाणार्‍या शब्दांचा अर्थ जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजार सध्या विक्रमी उच्चांकावर धावत आहेत. कोरोनाच्या कालावधीनंतर शेअर बाजारात जबरदस्त रिकव्हरी किंवा तेजी आली आहे. बाजाराच्या या तेजीमुळे लाखो नवीन किरकोळ गुंतवणूकदार बाजारात सामील झाले आहेत. गेल्या एका वर्षात विक्रमी संख्येने नवीन किरकोळ गुंतवणूकदारांनी डीमॅट खाती उघडली आहेत.

बाजारात नवीन गुंतवणूकदार आले आहेत मात्र अशा अनेक बेसिक शब्दांचा अर्थ त्यांना माहिती नसतो, जे बाजारात दररोज वापरले जातात. आजच्या या भागात आपण त्यातील काही बेसिक शब्दांचा अर्थ समजून घेणार आहोत.

बुल मार्केट (तेजी) : जर एखाद्याला वाटत असेल की बाजारात वाढ होईल आणि शेअर्सची किंमत वाढेल, तर असे म्हटले जाते की तो तेजीच्या स्थितीत आहे. दिलेल्या वेळेत बाजार वरच्या दिशेने जात राहिला, तर बुल मार्केट आहे, असे म्हटले जाते.

बेअर मार्केट (मंदी): तेजीच्या वातावरणाच्या विरुद्ध मंदीचे वातावरण असते. येत्या काळात बाजार खाली जाईल असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या स्टॉकबाबत बेयरिश आहात असे म्हटले जाते. तसेच बाजार बराच काळ खाली जात असताना, तेव्हा बेअर मार्केट असल्याचे सांगितले जाते.

ट्रेंड : बाजाराची दिशा आणि त्या दिशेची ताकद याला ट्रेंड म्हणतात. उदाहरणार्थ, जर बाजार झपाट्याने खाली जात असेल तर असे म्हटले जाते की बाजारात घसरणीचा ट्रेंड आहे किंवा जर बाजार वर किंवा खाली जात नसेल तर त्याला “साइडवे” किंवा दिशाहीन ट्रेंड म्हणतात.

शेअरची फेस व्हॅल्यू : शेअरच्या निश्चित किंमतीला फेस व्हॅल्यू म्हणतात. हे कंपनी ठरवते आणि त्यांच्या कॉर्पोरेट निर्णयांसाठी हे महत्त्वाचे आहे, जसे की डिव्हीडंड किंवा स्टॉक स्प्लिटच्या वेळी, कंपनी शेअरच्या फेस व्हॅल्यूचा आधार घेते. उदाहरणार्थ, जर Infosys शेअर्सची फेस व्हॅल्यू 5 असेल आणि कंपनीने 65 रुपयांचा वार्षिक डिव्हीडंड दिला असेल तर याचा अर्थ कंपनीने 1260% डिव्हीडंड दिला आहे. (65÷5)

52 week high/low : 52 week high म्हणजे गेल्या 52 आठवड्यांतील स्टॉकची सर्वोच्च किंमत. त्याचप्रमाणे, 52 week low म्हणजे 52 आठवड्यांतील सर्वात कमी किंमत.52 week high/low किंमत स्टॉकच्या किमतीची कॅटेगिरी दर्शवते. जेव्हा एखादा स्टॉक त्याच्या 52-आठवड्यांच्या उच्चांकाच्या जवळ असतो, तेव्हा बहुतेक लोकांचा असा विश्वास असतो की स्टॉक तेजीत असेल, त्याचप्रमाणे जेव्हा एखादा स्टॉक त्याच्या 52-आठवड्यांच्या नीचांकी जवळ असेल तेव्हा तो स्टॉक मंदीचा आहे असे मानले जाते.

Leave a Comment