हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे हे शहर झपाट्याने वाढताना दिसत आहे. पुण्याला विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी असे म्हटले जाते. त्यामुळे अनेक लोक हे शिक्षणासाठी तसेच कामासाठी पुण्यामध्ये स्थलांतर करत आहेत. त्यामुळे पुण्यात येणाऱ्यांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. जेव्हा नवीन लोक कुठल्याही शहरात जात असतात, त्यावेळी तेथील घरांची मागणी सगळ्यात जास्त वाढत असते. परंतु आता पुण्यामध्ये नक्की या घरांची मागणी किती वाढलेली आहे? आणि शहराच्या मध्यवर्ती भागात जर तुम्ही पुण्यामध्ये घर खरेदी करायचे असेल तर किती पैसे मोजावे लागतील हे आज आपण जाणून घेणार आहोत.
पुण्यातील मध्यवर्ती समजला जाणारा भाग म्हणजे डेक्कन परिसर. या शहरातील या मध्यवर्ती परिसरात आपले स्वतःचे हक्काचे घर असावे. अशी अनेकांची इच्छा असते. परंतु जर तुम्हाला या भागात घर घ्यायचे म्हटले, तर या घराच्या किमती जवळपास 2.5 कोटींच्या पुढे गेलेल्या आहेत. डेक्कन या भागामध्ये इतर अनेक सोयीसुविधा आहेत. विविध शाळा आहेत. कॉलेज आहेत तसेच व्यावसायिक दृष्ट्या देखील डेक्कन हा भाग अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे डेक्कन मधील घराच्या किमती आता करोडोच्या घरात गेलेले आहेत.
त्याचप्रमाणे पुणेचे रिअल इस्टेट मार्केट देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुण्यात घरी घेण्याची लोकांची इच्छा असते परंतु घराच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत की, सर्व सामान्य लोकांना पुण्याच्या मध्यवर्ती भागात घर घेणे परवडत नाही. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेली आहे. यामध्ये मेन्ट्रो स्टेशन अनेक सुविधा शिक्षण, आयटी कंपन्यांमुळे या ठिकाणी घराचे रेट वाढलेले आहेत. तुम्हाला जर पुण्यातील डेक्कन परिसर शिवाजीनगर भागात घर घ्यायचे असेल तर 2 बीएचके फ्लॅटची किंमत 1.5 कोटी रुपये एवढी आहे. तर 3 बीएचके घराची किंमत ही 2.5 कोटींच्या घरात गेलेली आहे..
या ठिकाणी डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लोकांचा कल हा या ठिकाणी राहण्यात जास्त असतो. त्यामुळे लोकांच्या मागणीत देखील वाढ होईल झालेली आहे. परंतु या ठिकाणी घर घ्यायचे असेल, तर तुम्हाला खूप मोठी रक्कम मोजावी लागते. जर तुम्ही देखील या ठिकाणी घर घेण्याचा विचार करत असाल तर त्या आधी तेथील सगळ्या किमती आणि इतर गोष्टींची माहिती करूनच घर घेण्याचा निर्णय घ्या.