वेटिंग तिकिट असताना जनरल कोचमध्ये प्रवास करत असाल तर होते ही शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेक लोक हे रेल्वेने प्रवास करतात. कारण रेल्वेचे तिकीट देखील कमी असते आणि प्रवास देखील अत्यंत आरामदायी असतो. परंतु आजकाल रेल्वेने प्रवास करणे खूप कठीण झालेले आहे. रेल्वेमध्ये (Train) खूप जास्त गर्दी असते. त्याचप्रमाणे तिकीट जरी कन्फर्म केले, तरी रेल्वेमध्ये जागा मिळत नाही. यासाठी प्रवाशांना जवळपास प्रवासाच्या कन्फर्म करावे लागते. दोन ते तीन मधून आधी तिकीट बुक करून देखील त्यांना वेटिंगमध्ये थांबावे लागते. लवकर त्यांना तिकीट मिळत नाही. परंतु हे वेटिंग तिकीट फिक्स होण्यासाठी प्रवासामध्ये खूप जास्त वाट पाहावी लागते. कितीतरी अनेक असे प्रवासी आहे जे वेटिंग तिकिटावर देखील प्रवास करतात.

अनेक लोक हे वेटिंग देखील घेऊन रिझर्व कोचमध्ये (Researve Coch) चढतात आणि असेच एक प्रकरण सुद्धा समोर आलेले आहे. जर तुम्ही देखील असे करत असाल तर तुम्ही खूप जास्त अडचणी देऊ शकता. नियमानुसार जर तुमच्याकडे वेटिंग तिकीट असेल आणि तुम्ही जनरल कोचमध्ये चढत असाल, तर रेल्वेच्या नियमानुसार तुम्ही असा प्रवास करू शकत नाही. पण हे खूप नियमांच्या विरुद्ध आहे. तुम्ही जर वेटिंग तिकिटावर प्रवास करत असाल, आणि जर तुम्हाला पकडले. तर त्यासाठी तुम्हाला खूप मोठा दंड भरावा लागू शकतो.

तुम्ही जर वेटींग तिकीटवर एसी कोच प्रवास करत, असाल तर ते कायदेशीर कारवाईनुसार अनुचित आहे. यामुळे तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. यामध्ये तुम्हाला 440 रुपयांचा दंड भरावा लागतो. तसेच तुम्हाला त्याच क्षणी ट्रेनमधून तुम्हाला खाली उतवले जाऊ शकते. त्याच प्रमाणे तुम्ही जर स्लीपर कोचमध्ये वेटींग तिकिटावर प्रवास करत असाल, तर तुम्हाला 250 रुपये दंड भरावा लागेल. आणि ट्रेनमधून खाली उतरावे लागेल.