हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण घरात महिनाभर कितीही वीज वापरतो पण महिना संपल्यानंतर जेव्हा आपल्या घरी लाईट बिल येते. तेव्हा मात्र आपल्याला मोठा धक्का बसतो की, एवढं बिल कसं काय आलं? अनेक लोकांचे असे म्हणणे असते की, आम्ही लाईटचा वापर खूपच कमी करतो. दिवसभर घरी देखील कोण नसतं. तरी देखील आम्हाला दर महिन्याला एवढं लाईट बिल कसे येते? परंतु अनेक वेळा तुमच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला एवढ्या जास्त प्रमाणात लाईट बिल येत असते. तुम्ही लाईट बाबत अशा अनेक चुका करत असता.ज्यामुळे तुमचं लाईट बिल हे जास्त येते. आता या चुका नक्की कोणत्या आहेत? आणि त्या चुका जर तुम्ही केल्या नाही, तर तुम्हाला लाईट बिल कसे कमी येणार आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
आपण घरात अनेक इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी वापरतो. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे काम झाल्यावर तुम्ही त्याची वायर काढून स्विच बंद करून ठेवत जा. अनेकवेळा आपण इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे चालू ठेवत असतो. त्यामुळे तुमचे बीज जोल जास्त येऊ शकते. आपल्याला असे वाटते की, आपण लाईटचा वापर जास्त केला नाही. परंतु आपल्या अनावधानाने आपण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या स्वरूपात या लाईटचा वापर करत असतो. त्यामुळे तुमचे वीजबिल जास्त असते.
आपला मोबाईल चार्ज करण्यासाठी आपण दररोज लाईटचा वापर करतो. आपला मोबाईल चार्ज झाल्यानंतर आपण मोबाईलची पिन काढतो. पण अनेक वेळा आपण बटन बंद करायला विसरतो. आणि यामुळेच आपले लाईट बिल जास्त येते. आपल्या घरी अशी अनेक बटणे असतात. जी विनाकारण सुरू असतात. त्यामुळे ही बटन तुम्ही बंद करत जा. तुम्ही जर विनाकारण बटन चालू ठेवले, तरी देखील तुमचे वीज बिल जास्त येऊ शकते. अनेक चार्जरने अगदी फास्ट चार्जिंग होती. परंतु जेव्हा एखादा चार्जर फास्ट चार्जिंग करतो. त्यावेळी वीज देखील जास्त प्रमाणात वापरली जाते.
ज्यावेळेस स्विचला तुमचा चार्जर जोडलेला असतो. आणि बटन चालू असते. त्यावेळी त्यातून विजेचा प्रवाह चालू असतो. यामुळे तुमच्या वीज बिळात देखील वाढ होत असते. मोबाईल चार्ज करण्यासाठी तुम्हाला 0.1 ते 0.4 युनिट्स वीज लागू शकते. त्यामुळे जर तुम्ही कोणतेही स्विच वापरत नसाल, तर ते बंद करून ठेवा. तसेच छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचे आहे. तरच तुम्हाला वीज बिल कमी येईल.