हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संडे हो या मंडे अंडी (Egg Benefits) कधीही खावा ती आरोग्यासाठी चांगलीच असतात, हे आपल्याला सतत सांगितले जाते. अंड्यामध्ये व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, सेलेनियम आणि आयोडीन, व्हिटॅमिन ए आणि फोलेट, बायोटिन असे अनेक घटक असल्यामुळे अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. परंतु हीच अंडी अधिक उष्ण असल्यामुळे ती उन्हाळ्यात खावीत की नाहीत? असा प्रश्न अनेकवेळा विचारला जातो. तसेच, उन्हाळ्यात अंडी खाण्याचे प्रमाण किती असायला हवे? अंडी खाल्ल्यानंतर कोणते दुष्परिणाम परिणाम होत नाहीत ना? याबाबत ही विचारले जाते. आज आपण याचं प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.
उन्हाळ्यामध्ये अंडी खावीत की नाहीत?
अंडी खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. अंडी खाल्ल्यामुळे अनेक पोषक घटक प्रथिने शरीरामध्ये जात असतात. परंतु असे असले तरी कोणताही ऋतू असला तरी अधिक प्रमाणात अंडी खाऊ नये. अंडे खाल्ल्यामुळे शरीरात द्रवपदार्थांचे संतुलन राखले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात अंडी खाणे नुकसानदायी ठरत नाही. तसेच, अंडीही उष्ण असतात. त्यामुळे सहसा उन्हाळ्यात अंड्याचा पाढंरा भाग खावा.
दररोज किती अंडी खायला हवीत?
दररोजच्या आहारात 2 अंडी खाणे सुरक्षित आणि आरोग्यदायी ठरते. अंड्यासह आहारात पाणी, फळे, हिरव्या पालेभाज्या यांचेही प्रमाण अधिक असायला हवे. तरच अंडी खाल्ल्यामुळे शरीरात दुष्परिणाम दिसून येणार नाहीत.
अंड्यात कोणते पोषक घटक असतात?
अंड्यामध्ये फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन डी, झिंक, कॅल्शियम कार्ब्स, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी 5, हे सर्व पोषक घटक असतात. अंड्यातील हे पोषक घटक शरीरातील कमतरता पूर्ण करतात.