कोबीची वाडी

0
90
Untitled design T.
Untitled design T.
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खाऊगल्ली | कोबीची भाजी सर्वांचीच नावडती भाजी असे. यावर पर्याय म्हणून कोबीच्या वड्या बनवू शकता . मुले वड्या आवडीने खातात.

साहित्य –

१) २ कप बारीक चिरलेली कोबी
२) १ चमचा लसूणपेस्ट
३) २ चमचालाल तिखट
४) १\२ चमचा हळद
५) २ चमचा तांदूळ पिठ
७) ६ चमचा बेसन
८) चवीपुरते मिठ
९) तेल
१०) चिरलेली कोथिंबीर
११) तीळ

 

कृती –

एका भांड्यात चिरलेली कोबी घ्यावी त्यात वरील सर्व जिन्नस घालावेत. थोडेसे पाणी घालून घट्टसर मळून घ्यावे. नंतर तेल घालून थोडे मळून घ्यावे. मळलेल्या या पिठाचे लांबसर रोल करून घ्यावे.
मोठे पातेले घ्यावे त्यात १ ते २ लिटर पाणी गरम करत ठेवावे. एका चाळणीला आतून तेल लावून घ्यावे. मळलेल्या पिठाचे रोल चाळणीत किंचीत अंतराने ठेवावे.
वरून झाकण ठेवावे. मोठ्या आचेवर १२-१५ मिनीटे वाफवावे. गॅस बंद करावा. ८-१० मिनीटांनी झाकण उघडून रोल बाहेर काढावे.
हव्या ताशा वड्या पाडून आवडीनुसार शालो फ्राय किंवा डिप फ्राय कराव्यात.
(टीप – लाल तिखट वापरण्याऐवजी आवडत असल्यास हिरवी मिरची वापरू शकता. )

 

इतर महत्वाचे –

कारल्याचे चिप्स

नारळी भात

पनीर भुर्जी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here