Kokan Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्यामुळे आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. आणि त्यांना चांगली नोकरी देखील मिळालेली आहे. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा असते. आता तीच इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता भारतीय रेल्वे विभागातून विविध रिक्त पदांच्या जागा निघालेल्या आहेत. खास करून भारतीय रेल्वेच्या कोकण रेल्वे विभागकडून (Kokan Railway Bharti 2024) ही भरती निघालेली आहे. दहावी आणि बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही नोकरीची खास संधी आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. आता ही भरती या भरतीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव | Kokan Railway Bharti 2024
या भारतीय अंतर्गत सीनियर सेक्शन, इंजीनियरिंग, स्टेशन मास्टर, कमर्शियल, सुपरवायझर, गुड्स ट्रेन मॅनेजर आणि टेक्निशियन मेकॅनिकल, टेक्निशियन III, इलेक्ट्रिकल असिस्टंट, लोको पायलट पॉईंट्स, ट्रॅक मॅनेजमेंट या पदांच्या रिक्त जागा आहेत.
रिक्त पदांची संख्या
भारतीय रेल्वे भरती अंतर्गत तब्बल 190 रिक्त जागा आहेत
आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
शैक्षणिक पात्रता
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कमीत कमी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर बारावी फिजिक्स आणि गणित या विषयात उत्तीर्ण असण्यासोबत इंजीनियरिंगमधील विविध विषयात पदवी असणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 39 दरम्यान असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे एससी, एसटी उमेदवारांना वयात 5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीचे अर्ज प्रक्रिया 16 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे 6 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करायचा आहे.
दरमहा वेतन | Kokan Railway Bharti 2024
या भरती अंतर्गत उमेदवाराशी निवड झाल्यानंतर त्या उमेदवाराला दर महिन्याला 18000 ते 44 हजार दरम्यान पगार मिळणार आहे
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा