नवी दिल्ली | कोल्हापूर ते वैभववाडी या बहुचर्चित रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून पाच महिन्यात या प्रकल्पाच्या पहिल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन होणार आहे. २०१९ च्या जानेवारी महिन्यात हे उदघाटन होणार आहे. या संदर्भात सुरेश प्रभू यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
१०३ किलोमीटर लांबी असणाऱ्या लोहमार्गाची दहा स्थानके नव्याने वाढवण्यात आली आहेत. इंदापूर, गोरेगाव, सोपे-वामने, कळंबी, कडवाई, वेरावळी, खेरे पाटण, अछीमे, मिरज आणि इनांजे ही नवीन स्थानके आराखड्यात सामील झाले आहेत. या प्रकल्पाचे काम ५० – ५० टक्के केंद्र-राज्य भागीदारी वर होणार असून त्याला ४० अब्ज डॉलर निधी खर्च होणार आहे.
Home ताज्या बातम्या मध्य आणि कोकण रेल्वेचा होणार, कोल्हापुरात संगम, बहुचर्चीत रेल्वे प्रकल्पाला मिळाली मान्यता