कोल्हापूरच्या 7 वर्षीय केदार साळुंखेने महिलांवरील अत्याचार थांबवा संदेश देत केले सायकलिंगमध्ये ४ विश्वविक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
रमणमळा येथील 7 वर्षाच्या विश्वविक्रमवीर केदार विजय साळुंखे याने आज शिवजयंती निमित्त “STOP VIOLENCE AGAINAST WOMEN” (महिलांवरील अत्याचार थांबवा) चा संदेश देत 45 किलोमीटरचे अंतर 105 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे होते ते त्याने 79 मिनटांमध्येच पूर्ण करून स्वतःच्या नावावर 4 विश्वविक्रम नोंदविले. त्याच्या या विक्रमाची नोंद चिल्ड्रन बुक ऑफ रेकॉर्ड (ग्लोबल)यामध्ये यामध्ये झाली असून यामध्येच त्याने हे 4 विश्वविक्रम नोंद केले आहेत.एकाच दिवशी एकाच वेळी 4 विश्वविक्रम करणारा तो पहिलाच सायकलिस्ट ठरला आहे.

यामध्ये त्याने फास्टेस्ट क्वार्टर सायकलिंग मॅरेथॉन, फास्टेस्ट हाफ सायकलिंग मॅरेथॉन, फास्टेस्ट फुल सायकलिंग मॅरेथॉन फास्टेस्ट 5 किलोमीटर सायकलिंग रन असे 4 विक्रम त्याच्या नावावर नोंद झाले आहेत. फास्टेस्ट क्वार्टर सायकलिंग मॅरेथॉन ही 10.5 किलोमीटर अंतर 22 मिनिट 30 सेकंदात पूर्ण करायची होती ती त्याने 19 मिनिट 22 सेकंदात पूर्ण केली आहे. तर फास्टेस्ट हाफ सायकलिंग मॅरेथॉन ही 21.1 किलोमीटरचे अंतर 47.30 सेकंदात पूर्ण करायचे होते ते त्याने 40 मिनिटात पूर्ण केले.तर फास्टेस्ट फुल सायकलिंग मॅरेथॉन ही 42.195 किलोमीटर अंतर हे 105 मिनिटात पूर्ण करायचे होते ते त्याने 76 मिनिटात पूर्ण केले.26 मिनिट आधीच त्याने विश्वविक्रम केला.फास्टेस्ट 5 किलोमीटर सायकलिंग रन ही 10 मिनिटात पूर्ण करायची होती ती त्याने 7.48 मिनिटात पूर्ण केली.

आज सकाळी या विश्वविक्रमास उजळाईवाडी येथून सकाळी 7 वाजता सुरुवात झाली यावेळी प्रमुख उपस्थिती गांधीनगर चे सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर व निरीक्षक मनमोहन रावत व कोरगावकर ट्रस्टचे अध्यक्षअमोल कोरगावकर यांच्या हस्ते या विक्रमाची सुरुवात झाली. हा विक्रम तावडे हॉटेल, सांगली फाटा, टोप, वाठार, किनी टोल नाका परत टोप, शिये फाटा, कसबा बावडामार्गे पोलीस अधीक्षक चौक कोल्हापूर येथे समाप्त झाला. त्याने विश्वविक्रम हा भारत पेट्रोल पंप येथे कसबा बावडा येथे पूर्ण केला.

पोलीस अधीक्षक चौक तिरंगा झेंडा येथे आल्यानंतर सकाळी त्याचे जलोशी स्वागत ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करून करण्यात आले. याठिकाणी आल्यानंतर त्याचे महापौर निलोफर आजरेकर सोनाली नावांगुळ, उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, ग्लोबल रिचर्स अँड रेकॉर्ड सेंटर मनमोहन रावत व मातोश्री वृद्धश्रम च्या ]वैशाली राजशेखर,प्रिंसिपल स्नेहल नार्वेकर,अमोल कोरगावकर, दादासाहेब लाड, डॉ. सतीश पत्की,सौ.उज्वला पत्की,कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, आदी स्वागत पर कार्यक्रमास उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरख गोरख कोळी यांनी केले यावेळी ग्लोबल रिसर्च अँड रेकॉर्ड सेंटरचे निरीक्षक मनमोहन रावत यांनी विश्वविक्रमवीर डॉ. केदार साळुंखे याने 4 विश्वविक्रम पूर्ण केल्याची घोषणा केली.व त्याचे कौतुक केले. केदार याने वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी 7 ते 12 वयोगटातील सायकलिंगचे रेकॉर्ड 26 मिनिट अगोदर पूर्ण करून रेकॉर्ड पूर्ण नवीन इतिहास घडविल्याचे सांगितले.

महापौर निलोफर आजरेकर यांनी केदारने लहान वयात विश्वविक्रम करून कोल्हापूरच्या नावलौकिकात भर घातला आहे त्याने आपल्या पुढील काळात आणखी घवघवीत कामगिरी करावी अशा शुभेच्छा दिल्या. केदारने आपल्या वयाच्या 7 व्या वर्षी विश्वविक्रम केला आहे. त्याला यासाठी मदत करणारी त्याची आई जिजाऊ सारखी त्याच्या पाठीशी उभी असल्याचे सांगून केदारला घडविण्यात या जिजाऊचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. निसर्गानेच केदारला ही शक्ती दिल्याने त्याने लहान वयात हा विक्रम केल्याचे सांगितले. यावेळी बोलताना जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांनीही मनोगत व्यक्त केले. एकाच दिवशी विक्रम करणारा हा लहान मुलगा मी प्रथमच पाहिला असून हॉस्पिटलमध्ये जन्माला आला हे माझे भाग्य असल्याचे डॉक्टर सतीश पत्की यांनी सांगितले.यावेळी बोलताना सोनाली नवांगुळ यांनी त्याला शुभेच्छा दिल्या नेहमी आपले पाय जमिनीवर ठेवून आपल्याला मदत करणाऱ्यांना समोर ठेवून त्यांचा मान राखून पुढे जा असा सल्ला दिला.

त्याच्या या कामगिरीबद्दल न्यू रेसर सायकल क्लब, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, लौकिक फोटो कुडित्रे यांनी त्याला सन्मान चिन्ह देऊन कौतुक केले.यावेळी विविध संघटना व मान्यवरांनी त्याचा सत्कार केला.त्याच्या येण्या जाण्याच्या मार्गावरही फटाक्यांची आतषबाजी करून पुष्पवृष्टी करून त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी ग्लोबल रिसर्च अँड रेकॉर्ड सेंटर च्या वतीने केदारचे कोच स्वप्नील कोळी, विगब्योरच्या प्रिंसीपल स्नेहल नार्वेकर,कोच हेमंत लोहार, आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर अमोल खेडकर,कोच गोरख कोळी,सह्याद्री विद्यानिकेतन माले च्या मुख्याध्यापिका सारिका यादव,आयर्नमॅन आकाश कोरगावकर आदींचा सत्कार करण्यात आला.शेवटी शिवजयंती निमित महिलांचा सन्मान राखण्याची व संरक्षण करण्याची शपथ घेण्यात आली. केदारच्या या यशात त्याची आई सौ.स्वाती गायकवाड साळुंखे व वडील विजय साळुंखे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. आभार स्वाती गायकवाड साळुंखे यांनी मानले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment