‘जय शिवाजी’, ‘हरहर महादेव’ म्हणत कोल्हापूरच्या 80 वर्षांच्या आजीने सर केला रायगड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायगड : हॅलो महाराष्ट्र – 6 जून रोजी रायगडावर किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, हरहर महादेव या घोषणांनी किल्ले रायगड दुमदुमला होता. अशा घोषणा देणाऱ्यांमध्ये एक आवाज होता तो कोल्हापूरच्या (kolhapur) 80 वर्षांच्या आजीबाईंचा. ज्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी रायगड सर केला आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आऊबाई भाऊ पाटील असे या 80 वर्षांच्या आजीबाईंचे नाव आहे. त्या कोल्हापूरच्या (kolhapur) दिंडनेर्ली गावातील रहिवाशी आहेत.

रायगडावर नुकत्याच झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थिती लावली. तसं रायगडावर वृद्ध व्यक्ती जात नाहीत असं नाही पण ते शक्यतो रोपवेने जातात. पण या आजींनी मात्र पायीच रायगड सर केला आहे. आऊबाई यांनी पहिल्यांदाच हा किल्ला सर केला नाही. तर त्या दुर्गवेड्या आहेत. आतापर्यंत त्यांनी 23 किल्ले सर केले आहेत. ज्या वयात बरेच लोक तीर्थक्षेत्राला जातात त्या वयात आजी दुर्गभ्रमंती करत आहेत.

या वयात गड चढणं म्हणजे वाटतं तितकं सोपं नाही. अगदी तरुणांनाही घाम फुटतो. याबाबत बोलताना आजी म्हणाल्या त्रास कुठला उलट तरुण मुलं माझ्याकडे बघून तोंडात बोटं घालतात. गड चढण्याची ऊर्जा मला शिवरायांच्या घोषणेतून मिळते.

हे पण वाचा :
Google Pay वर आता वापरता येणार Hinglish भाषा !!!

OTT प्लॅटफॉर्म आणि चित्रपटगृहांबाबत Abhishek Bachchan चे मोठे विधान !!!

खुशखबर !!! नवीन M2 चिप सहित येणार नवीन MacBook Pro आणि MacBook Air

पहिल्या वर्धापनदिनालाच पुन्हा ‘अडकले’ Income Tax पोर्टल, विभागाने इन्फोसिसला फटकारले

Drugs : भारत-पाक सीमेवर 15 कोटी किंमतीचे साडेतीन किलो हेरॉईन जप्त

Leave a Comment