Thursday, March 30, 2023

कोल्हापूरमध्ये ज्योतिषी श्वेता जुमानी यांच्या विरोधात अंनिसच तीव्र आंदोलन

- Advertisement -

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
अंकशास्त्रनुसार भविष्य सांगणाऱ्या श्वेता जुमानी यांच्या विरोधात कोल्हापूरात आंदोलन करण्यात आलंय. पुरोगामी कोल्हापूरातून श्वेता जुमानी चले जाव, आकड्याचा खेळ बंद कराच्या जोरदार घोषणा करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे.

आजपासून पुढचे दोन दिवस श्वेता जुमानी कोल्हापूरातील कदमवाडी रोडवरील एका हॉटेलमध्ये थांबणार आहेत. त्याच हॉटेलच्या समोर हातात लक्षवेधी पोस्टर घेऊन जोरदार घोषणाबाजी करत अंनिस कार्यकर्त्यांची आंदोलन केलं. यावेळी हॉटेलच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.