कोल्हापुरात संजय राऊत यांच्या विरोधात भाजपाने केलं निदर्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजपने जोरदार निदर्शने करत संताप व्यक्त केलाय. शिवसेनेचे संजय राऊत म्हणजे वाचाळवीर असल्याची टीका भाजपा महानगर अध्यक्षांनी केली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कोल्हापुरातही याचे पडसाद उमटले आहेत. राऊत यांनी बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमांमध्ये ‘माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा.’ असे वक्तव्य केले होते.

त्यांच्या या वक्तव्याबद्दल भाजपकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. शिवाय प्रसिद्धीसाठी हापापलेल्या राऊत त्यांची आता वेळ भरली असल्याचे म्हणत त्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

Leave a Comment