कोल्हापूर स्फोटाचा सखोल तपास सुरु; २०१४ ची पुनरावृत्ती झाल्यामुळे खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूरचा एंट्री पॉइंट समजल्या जाणाऱ्या उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा असून सुद्धा घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक तपासणी करत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली होती.

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरालगत दोन एमआयडीसी आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीएक ट्रक चालक दत्तात्रय पाटील गोकुळ शिरगाव एमआडीसी मध्ये साहित्य उतरवून जाधववाडीला घरी जात होते. पुणे बेंगलोर महामार्गावरील उजळाईवाडी उड्डानपुलाजवळ त्यांच्या ट्रक मध्ये बिघाड झाल्याने त्यांनी ट्रक उड्डाणपुलाखाली बाजूला घेतला. मित्राला बोलावून घेत ते मोबाईल वर बोलत ट्रक मधून खाली उतरले आणि लघु शंकेसाठी बाजूला पडलेल्या एका आडस्थानी गेले. मात्र त्यांनी तेथे पडलेल्या अल्युमिनियमच्या डब्याला लाथ मारली. त्याच क्षणी हा स्फोट झाला.

या महामार्गावरती याच परिसरामध्ये वाहनांचे टायर फुटण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सुरवातीला एखाद्या वाहनाचा टायर फुटल्याचा भास स्थानिकांना झाला. मात्र महामार्गावरील धावपळ पाहून काहीजण घटनास्थळाकडे धावले. विशेष म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात ही याच परिसरात असाच एक स्फोट झाला होता. मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना स्फोटाची पुनरावृत्ती झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आता उच्चस्तरीय तपास यंत्रणांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे.

शरद पवारांना प्रत्युत्तर देताना उदयनराजे अडखळले

Leave a Comment