वाहन चालकांचे रस्त्यावर बसून खर्डा भाकरी आंदोलन

0
36
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर शहरातील खड्डेयुक्त रस्ते डांबरीकरणास महापालिका प्रशासन कमी पडत असल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघातर्फे खड्डयात बसून भोजन करण्यात आले. या खड्डेभोजन आंदोलनाने जणू नववर्षाचे स्वागत करण्यात आले. पापाची तिकटी ते शिवाजी चौक या मार्गावर हे आंदोलन करण्यात आले.

शहरातील शिवाजी चौक ते पापाची तिकटी हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आहेत. रस्त्यातील महाकाय खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे आहेत. खराब रस्त्यामूळ या मार्गावर वाहतुकोंडीमुळं वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या रस्त्यावरून प्रवास करताना चालकांना धुळीचा सामना करावा लागतो. याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले. शिवाजी चौकातून जाताच खड्डेपुरात आपले स्वागत आहे, या आशयाची रांगोळी काढून आंदोलनास सुरुवात झाली. चप्पल लाईनला रस्त्याच्या दुतर्फा पंगत पडली. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here