व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कोल्हापूरात आणखी एक कोरोनाग्रस्त सापडला; संख्या ३ वर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूरमध्ये आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला असून कोरोनाग्रस्तांची संख्या आता ३ वर गेली आहे. कसबा बावडा येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळला नव्हता. मात्र, आज नवा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.कोरोना बाधित महिला ही कसबा बावड्यातील मराठा कॉलनीतील आहे.

या महिलेचा अहवाल सीपीआर प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. ही महिला काही दिवसांपूर्वीच साताऱ्याहून कोल्हापूरात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. भक्तीपुजानगर नंतर कसबा बावड्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने कोल्हापूरकरांत भीतीचे वातावरण आहे.

तर राज्यातील करोनाग्रस्तांच्या आकड्यात सुद्धा दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. सोमवारी राज्यात ३३ नवीन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये १९, मुंबईत ११, तर अहमदनगर, सातारा आणि वसईमध्ये प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ७८१ वर पोहोचला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”