Sunday, April 2, 2023

कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिसांनी पंढरपूरातून जप्त केला ५ लाखांचा गांजा; २ तस्करांना अटक

- Advertisement -

कोल्हापूर प्रतिनीधी । सतेज औंधकर
कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिसांनी गांजा तस्करीचा तपास करताना पंढरपूर मधून एका संशयिताच्या घरातून २१ किलो ७७० ग्रॅम गांजा जप्त केला. बाजारात या जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे ५ लाख १० हजार ७५० रुपये इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दिनांक १३ फेब्रुवारी रोजी राजारामपुरी पोलिसांनी मंजुनाथ फरिरप्पा मंडगोडली आणि अमित देवमारे या दोघांना शाहू टोल नाका ते मोरेवाडी या मार्गावर गांजा विक्री करताना अटक केली. त्याच्याकडून दीड किलो गांजा जप्त केला होता. कोर्टाने दोघांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तपास करताना मंजूनाथने पंढरपूरातून शंकर मारुती देवमारे आणि अमित शंकर देवमारे यांच्याकडून विक्रीसाठी गांजा आणत असल्याची माहिती दिली.

- Advertisement -

त्यानंतर उपनिरीक्षक समाधान घुगे आणि त्यांच्या पथकाने पंढरपूरातील देवमारे यांच्या घरावर छापा टाकला. त्या ठिकाणी असलेला २१ किलो ७७० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. पोलिस निरीक्षक नवनाथ घोगरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार आनंद निगडे, पोलिस नाईक प्रकाश पारधी, नितीन रेडेकर, सुभाष चौगले, विशाल खराडे, रोहित पोवार, तानाजी दावणे, सिद्धेश्वर केदार, रवी आंबेकर, महेश पाटील, प्रशांत पाथरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.