कोल्हापूरात संचारबंदीत फिरणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांचा ‘लाठी’ प्रसाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोरोना वायरसचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. कोल्हापूरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने 33 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे आज अखेर कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण कोल्हापुरात नसला तरीही जवळपास 640 पेक्षा अधिक संशयितांची तपासणी पूर्ण करून त्यांना कोरटाईन करण्यात आलं आहे.

जगभरात थैमान घालणारा कोरोना व्हायरल हा भारतात देखील दाखल झाला आहे. कोरोना व्हारायस चे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या महाराष्ट्रात या व्हायरसचा फैलाव झपाट्याने होत आहे. या व्हायरस ला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन हे अतोनात प्रयत्न करताना पहायला मिळत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी काळात कोल्हापूर शहरात अनेक दुचाकीस्वार चारचाकी स्वार कामाव्यतिरिक्त फिरताना दिसत आहेत त्यांना अशांवर पोलीस कारवाई करताना पहायला मिळत आहे. तर हुल्लडबाजी वाहनचालकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद देखील खावा लागला आहे.

कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासन व्हायरस या पार्श्वभूमीवर खडबडून जाग झाला आहे. कोल्हापूर जिल्हा हा प्रशासनाने जवळ सुमारे तीस पेक्षा अधिक ठिकाणी नाकाबंदी केली आहे तर 600 पेक्षा अधिक संशयितांची तपासणी केली आहे आज अखेर कोल्हापूरात कोणीही रुग्ण पॉझिटिव्ह नसला तरी जिल्हा प्रशासनाने सांगितलेल्या बाबींवर अंमलबजावणी करणं गरजेचं असल्याचं पालकमंत्र्यांनी म्हटल आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच प्रशासकीय यंत्रणा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती सज्ज झाली आहे विविध ठिकाणी कोणा बाहेरच्या पार्श्वभूमीवरती उपाय योजना करण्यात येत आहे. नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज असून संचारबंदी काळात कोणीही बाहेर पडू

नये प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. संचारबंदी काळात विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तीं वरती पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे तर काहींना फटकेबाजी पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला आहे तरीदेखील कोल्हापूरचे नागरिक आजही रस्त्यावरती पाहायला मिळतात नागरिकांना स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर जिल्हा प्रशासनाने सांगितलेली प्रत्येक गोगष्ट आपण पाळली पाहिजे असं आवाहन देखील करण्यात येते.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment