सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
क्रीडाप्रेमी, खेळाडूंचे, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढविणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटात कोल्हापूर विभागाने अजिंक्यपद पटकावले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात मुंबई संघावर तीन गुणांनी मात केली. तर 17 वर्षाखालील मुलींच्या गटात पुणे विभागाने प्रथम क्रमांक पटकावत. पुणे संघाने कोल्हापूर संघावर 13 गुणांनी हरविले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा, के. एस. डी. शानभाग विद्यालय व जुनिअर कॉलेज सातारा संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
विजेत्या संघांना जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज पाटील, राष्ट्रीय बास्केटबॉलपटू आंचल घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी, प्रमाणपत्र, मेडल देण्यात आले. मुलांचा अंतिम सामना कोल्हापूर विरुद्ध मुंबई यांच्यात झाला. अत्यंत चुरशीचा झालेल्या या सामन्यात कोल्हापूर विभागाने मुंबई विभागावर 43-40 अशी मात करत विजेतेपद पटकाविले. तर 17 वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम सामना पुणे विरुद्ध कोल्हापूर यांच्यात झाला. या सामन्यात 52- 39 असा झाला. यात पुणे विभागाने विजेतेपद पटकाविले.
राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या गटात मुंबई विभागाने द्वितीय क्रमांक, तर तृतीय क्रमांक पुणे विभागाने मिळविला. 17 वर्षांखालील मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक कोल्हापूर विभागाने पटकावला तर तृतीय क्रमांक मुंबई विभागाने मिळविला. मुलांच्या सामन्यात कोल्हापूरचे खेळाडू अथर्व परदेशी -तेरा , कुणाल शिराळे -सात, ध्रुव निकम -सहा तर मुंबई विभागाच्या जादेन रोड्रिक्स- 16, वेंकटराजे याने अकरा गोल केले. मुलींच्या सामन्यात पुणे विभागाच्या साम्या के -22, रिद्धी एन – 24 तर सोनल लांवगरे 23, सिद्धी निंबाळकर हिने सात गोल केले.