कोल्हापूर प्रतिनिधी। हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील गायरानामध्ये मध्ये सुरू असलेल्या अवैध गाैणखनिज उत्खननावर तहसिलदारांच्या पथकाने शुक्रवारी धडक कारवाई केलीय आहे. तहसीलदार प्रदिप उबाळे यांनी धडक माेहिम उघडत २१ जेसीबी, ७ पाेकलॅन्ड आणि ट्रँक्टर तसेच ४ डंपर ताब्यात घेतले आहेत. हि कारवाई सकाळी सहा वाजल्यापासुन ते दुपारी १२ पर्यंत माेठ्या पाेलिस बंदाेबस्तात सुरु हाेती.
दरम्यान नेहमीप्रमाणे टाेप येथील खाण व्यवसाय सुरू हाेते. मात्र आज अचानक झालेल्या या कारवाईने एकच गाेंधळ उडाला. तहसीलदार कार्यालयाकडे अवैध उत्खनना बाबतच्या अनेक तक्रारी आल्या होत्या या तक्रारीमुळे ही कारवाई करत असल्याचे तहसिलदार उबाळे यांनी सांगितले. उबाळे यांच्या पथकाने अवैध उत्खनन सुरु असलेल्या खाणीत पाहणी केली असता, त्याना सुमारे २१ लहान माेठे जेसिबी, पाेकलॅन्ड आढळुन आले. त्यानंतर या सर्व वाहनांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या ही वहाने शियेफाटा येथील माेकळ्या जागेत आणण्यात आली आहेत.
दरम्यान मागील काही महिन्यांमध्ये माेठया प्रमाणावर झालेली हि पहिलीच कारवाई आहे. या पथकात जिल्हा खनिकर्म आधिकारी अमाेल थाेरात, नायब तहसिलदार दिंगबर सानप, हातकणंगले चे पाेलिस निरीक्षक अरविंद काळे आदी अधिकाऱ्यांसह सहा तलाठी देखील सहभागी होते.