कोल्हापूरात वैद्यकीय सेवेतील सर्वांना मिळणार ‘कॉटन मास्क’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर जिल्हयातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर्स आदी सर्वांना मास्क देणार असल्याची ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीपीआरमधील कोरोना स्वतंत्र कक्षाला खासदार माने यांनी भेट देऊन रुग्णांना पुरविण्यात येणाऱया वैद्यकीय सेवा व सुविधांचा आढावा घेतला याप्रसंगी ते बोलत होते.

मास्कच्या उपलब्धतेसाठी इचलकरंजीतील गारमेंट ईडस्ट्रीला कॉटन कापडाचे मास्क तयार करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी.केंम्पीपाटील, राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये व वैद्यकीय स्टाफ उपस्थित होता.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment