कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामाची खा. श्रीनिवास पाटील यांच्याकडून पाहणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामाची खा. श्रीनिवास पाटील यांनी शुक्रवारी जागेवर जाऊन पाहणी केली. प्रगतीपथावर असणा-या सदर रस्त्याच्या कामाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.  खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड येथील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामासाठी 3 कोटी 50 लाख एवढा भरीव निधी मंजूर झाला आहे. लाॅकडाऊनमुळे कराड शहरातील या रस्त्यावरील रहदारी बंद असल्याने सदरच्या कामास गती मिळाली आहे.

कराड ते विटा हा मार्ग कराड शहरातून जात असून कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांना प्रवास करताना गैरसोयीचे ठरत होते, तर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने या मार्गावरील वहानांसाठी अडथळा निर्माण होऊन शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत होती. त्यामुळे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली होती. या मागणीनुसार खा. श्रीनिवास पाटील यांनी हा भरीव निधी मंजूर करून घेतला आहे.

सध्या या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. यावेळी जयंत पाटील, जयंत बेडेकर, सारंग पाटील, रणजीतसिंह पाटील, पोपटराव साळुंखे, सद्दाम आंबेकरी, शिवाजीराव पवार, गंगाधर जाधव, प्रशांत शिंदे, अनिल धोत्रे व उपअभियंता निखिल पानसरे उपस्थित होते. तसेच कामाची गुणवत्ता उत्तम असून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment