कोल्हापूरचे साहिल चौहान ठरले पहिले शाकाहारी ‘आयर्नमॅन’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । कोल्हापूरच्या एस. बी. चौहान स्टीलचे साहिल सुरेश चौहान हे या वर्षीचे ‘आयर्न मॅन’ ठरले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या २२६ किमीच्या या स्पर्धेत जगातील हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. चौहान यांच्या या विजयाने कोल्हापूरच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण शाकाहारी असलेले चौहान हे ही स्पर्धा पूर्ण करणारे एकमेव ठरले आहेत.

‘वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आयर्न मॅन २०१९’ ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया येथे पार पडली. एकूण २२६ किमी चे असणारे अंतर चौहान यांनी १३ तास ४५ मिनीटांत पूर्ण केले. यामध्ये ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी धावणे असे प्रकार त्यांना १७ तासांमध्ये पूर्ण करायचे होते. साहिल यांचे इंग्लंड येथून मास्टर ऑफ इंजिनीरिंग शिक्षण झाले आहे. चौहान यांना यासाठी निळकंठ आखाडे, दीपक राज, निल डी-सिल्वा यांचे मार्गदर्शन लाभले.