कोल्हापूरात महाशिवरात्री दिनी सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या स्मृतींना उजाळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
महाशिवरात्री दिनी बहलोल खानाशी लढताना सहा मावळ्यांसह वीरगती प्राप्त झालेल्या प्रतापराव गुजर यांच्या स्मृतिदिनी अनेक शिवभक्तांनी स्मारकस्थळी येऊन अभिवादन करत प्रतापरावांच्या स्मृतींना उजाळा दिला. सकाळी स्मारकस्थळी शिवमंदिरातील शिवपिंडीस, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व प्रतापराव गुजर यांच्या समाधीस अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आले. रविराज कुपेकर यांच्या हस्ते अभिषेक झाला.

त्यानंतर स्मारकस्थळी झालेल्या कार्यक्रमात स्मारक समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कुपेकर, उपाध्यक्ष संग्रामसिंह कुपेकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर या वेळी प्रमुख वक्ते अखलाख मुजावर यांचे भाषण झाले. याप्रसंगी भैयासाहेब कुपेकर, यशोमतीदेवी कुपेकर, सिमादेवी कुपेकर, कानडेवाडी सरपंच वनिता शिंदे, गावठाण सरपंच नंदाताई नांदवडेकर यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर नेसरी बसस्थानकावरील प्रतापराव गुजर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन संजय हल्याळी यांनी केले. यावेळी प्रमोद गिरी, यशवंत देसाई, सुरेश कुराडे, कृष्णराव रेडेकर, संदीप देसाई, बापू देसाई, अभिजित मगर, राजेंद्र हल्याळी, बबन पाटील, शरद साखरे, बाळु काविलकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment