कोल्हापूर । कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवानाने सीमेवर प्राणाची आहुती दिली आहे. जम्मू काश्मीरमधील राजोरी भागात 16 मराठा पोस्टवर पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात निगवे खालसा येथील संग्राम पाटील (Sangram Patil) यांना वीरमरण आलं. गेल्याच आठवड्यात जवान ऋषिकेश जोंधळे (Rishikesh Jondhale) शहीद झाले होते.
संग्राम पाटील हे भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत होते. निगवे खालसा गावासह परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. शहीद जवान हवालदार संग्राम पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या जवानाला वीरमरण आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांनी देशाच्या रक्षणासाठी अवघ्या 20 व्या वर्षी आपल्या प्राणांची बाजी लावली. पाकिस्तानने 13 नोव्हेंबरला शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला होता. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, या गोळीबारात महाराष्ट्राने आपला वीरपुत्र गमावला. (Kolhapur Nigwe Sangram Patil Martyr in Pak Attack)
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in