कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर जिल्ह्यातल्या अशी चोरीची घटना घडली आहे जी ऐकून तुम्ही सुद्धा अवाक हवा व्हालं. कोल्हापूरमध्ये चंदगड तालुक्यातील खामदळे या गावात एका पिग फार्ममधून ८० डुक्करं चोरल्याची घटना समोर आली आहे. या पिग फार्मचे मालक सचिन पाटील यांनी चंदगड पोलिसात चोरीची तक्रार दिली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, खामदळे गावात सचिन पाटील यांचा पिग फार्मचा व्यवसाय आहे. सचिन यांनी घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर हा पिग फार्म उभारला आहे. या फार्ममध्ये यॉकशार जातीची जवळपास १०० पाळीव डुकर त्यांनी पाळली गेली होती. मात्र, डुकरांसाठी तयार केलेल्या शेडच्या भिंतीला असणारी जाळी उचकटून काही अज्ञात चोरट्यांनी ८० डुक्कर पळवले असल्याचे सचिन यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली.
सचिन यांनी सुमारे १० लाख किंमतीचे ८० डुक्कर चोरीला गेल्याची तक्रार चंदगड पोलिसात दिली आहे. सचिन यांच्या तक्रारीनंतर पहिल्यांदाच डुक्करांना शोधण्याच आव्हान पोलिसांसमोर आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.