निवडणुक कामाचा भत्ता मागणार्‍या शिक्षकाला पोलिसांची धक्काबुक्की

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | निवडणुकीचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना धक्काबुक्की झाल्याची घटना कोल्हापुरच्या गडहिंग्लज येथे घडलीय. 22 आणि 23 एप्रिल असे दोन दिवस पूर्णवेळ काम करूनही केवळ तीनशे रुपये भत्ता देत असल्याने संतप्त झालेल्या शिक्षकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता एका शिक्षकाला पोलिस अधिकाऱ्याकडून धक्काबुक्की करण्यात आलीय. येथील शिक्षकाने हा संपूर्ण प्रकार आपल्या कॅमेरात कैद केला.

गडहिंग्लज येथे काल 100 हून अधिक शिक्षकांना रिझर्व (राखीव) ठेवण्यात आले होते. राखीव शिक्षकांपैकी बऱ्याच शिक्षकांना झोनल ऑफिसर यांच्यासोबत कामगिरी देण्यात आली व बहुतांश शिक्षकांना 22 तारीख व 23 तारखेला पूर्णवेळ रात्री अकरा वाजेपर्यंत गडहिंग्लज येथे निवडणूक कार्यालयात थांबून घेण्यात आले. निवडणूक कामकाज पूर्ण झाल्यानंतर दहा वाजता भत्ता मागत असताना भत्ता देय नसल्याचे अधिकाऱ्यांच्याकडून सांगण्यात आले. पण अशावेळी काही शिक्षक घरी निघून गेले. पण बऱ्याच शिक्षकांनी भत्त्याची मागणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु याला कुठलीही दाद प्रशासनाकडून देण्यात आली नाही.

यावेळी भत्त्याबाबत विचारणा करत असताना अचानक एका पोलिस अधिकाऱ्याकडून भत्ता मागणाऱ्या शिक्षकाला धक्काबुक्की झाली. हा संपूर्ण प्रकार एका शिक्षकाने आपल्या कॅमेरात कैद केला. यावेळी सर्व शिक्षकांनी आपली एकजूट दाखवून पोलिसांची अरेरावी खपवून घेतली नाही. सर्वांनी याला विरोध करत प्रशासनाला शासनाने दिलेल्या नियमानुसार भत्ता देण्यास भाग पाडले.

Leave a Comment