कोल्हापूर प्रतिनिधी। रस्त्याने जाताना खड्डा पहिला कि अंगावर शहारे उभे राहतात, कोल्हापूरकरांना मात्र याच खड्ड्यांचा करावा लागतोय. अनेकदा प्रशासनाला निवेदने दिली या खड्ड्यांचा प्रश्न काही सुटत नाही. त्यामुळे अखेर प्रशंसनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी एक हटके कल्पना अवलंबली आहे.
रस्त्यावर काढलेली पांढरी रांगोळी भोवताली पसरलेल्या फुलांच्या पाकळ्या या सगळ्याकडे पाहून आपल्याला वाटेल कि इथं कुंचही तरी मिरवणूक येणार आहे. पण हि मिरवणूक नसून, प्रशासनाचा निषेध करण्यासाठी केलेली एक हटके आयडिया आहे. खड्ड्यांमुळे त्रस्थ झालेल्या नागरिकांनी खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करत स्थानिक प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.
कोल्हापूर शहरातील गंगावेश परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने खड्ड्याभोवती रांगोळी काढून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. वाहनधारकानी या आंदोलनात सहभाग घेतला. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत केक कपात खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. या अनोख्या आंदोलनाची शहरात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.