Thursday, March 23, 2023

आईची हत्या करुन अवयव भाजून खाणाऱ्या नराधम मुलाला फाशीची शिक्षा, कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशी

- Advertisement -

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूर शहरातील माकडवाला वसाहतीत 28 ऑगस्ट 2017 रोजी एक दुर्दैवी घटना घडली होती. यामध्ये दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून सुनीलने आई यल्लवा कुचकोरवी हिचा खून केला होता. त्याने अत्यंत क्रूर पद्धतीने आपल्या आईचा खून केला होता. त्याने फक्त खून केल्यानंतर आईचे अवयव भाजून खाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली होती. या खटल्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी या केससंदर्भात महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

नेमकं काय घडलं?
आरोपी सुनील कुचकोरवी हा कवळा नाका येथील वसाहतीत राहत होता. 28 ऑगस्ट 2017 रोजी आईने दारुसाठी पैसे न दिल्यामुळे त्या दोघांमध्ये वाद झाला. यानंतर आरोपी सुनील याने आपल्या आईची निर्घुणपणे हत्या करुन त्याचे तुकडे केले. त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी केला होता. या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांच्या न्यायालयात सुरु झाले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅडव्होकेट विवेक शुक्ल यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूनी करण्यात आलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सुनीलला दोषी ठरवले.

- Advertisement -

फाशी की जन्ममठेप यावर युक्तिवाद
सुनीलला जन्मठेप द्यायची की फाशीची शिक्षा याबाबत दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला होता. सुनीलने केलेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचे सांगत न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. कोल्हापूरच्या आजवरच्या इतिहासात हि पहिलीच फाशीची शिक्षा ठरली आहे.