कोल्हापूरात २ करोना संशयित रुग्णांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक करोना पॉझिटिव्ह होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्यातरी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, शहरातील २ करोना संशयित रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाल्याने कोल्हापूरात खळबळ उडाली आहे.

मृतांपैकी एक ३७ वर्षीय तरुण छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विशेष करोना कक्षात भरती होता. तर दुसऱ्या ८५ वर्षीय रुग्णावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन्ही संशयीत रुग्णांना न्यूमोनिया झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. संबंधित दोघांच्या घशातील नमुने तपासणीसाठी पुण्याला राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्रलंबित असून रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment