Breaking | कोल्हापूर अर्बन बँकेला या तंत्राचा वापर करून ६७ लाखांचा गंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | सकलेण मुलाणी

दी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला आॅनकाईन पद्धतीने ६७ लाखांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. दी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एचडीएफसी खात्यातून ऑनलाईनद्वारे 67 लाख 88 हजार चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडालीय.

आरटीजीएस व एनईएफटी ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करून, संशयिताने अर्बन बँकेला गंडा घालून फसवणूक केली आहे. शुक्रवारी सकाळी 11.05 ते दुपारी 2.28 या काळात ही घटना घडलीय. लाखोंची रक्‍कम परस्पर 34 खात्यांवर हस्तांतर केल्याने चोरट्यांचा तोास लावणे आता मुश्किल झाले आहे.

रात्री उशिरा शाहूपुरी पोलिस ठाण्यात अनोळखीविरुद्ध अपहार, फसवणूक, माहिती, तंत्रज्ञान अधिनियम 2008 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलीस मुंबई सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.

लंपास झालेली रक्‍कम वेगवेगळ्या 34 खात्यांवर हस्तांतर झाली असून यात आंतरराष्ट्रीय टोळीचा हात असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. ‘दी कोल्हापूर अर्बन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बाजीराव खरोशी यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली असून कोल्हापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment