Komaki Electric Cruiser Bike : 240 KM रेंजसह लाँच झाली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक; किंमत किती?

Komaki Electric Cruiser Bike
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Komaki Electric Cruiser Bike । भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वाढत्या मागणीनुसार, अनेक कंपन्या त्यांच्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लाँच करत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोमाकी इलेक्ट्रिकने भारतात त्यांच्या २ नवीन इलेक्ट्रिक क्रूझर बाइक्स लाँच केल्या आहेत. रेंजर प्रो आणि रेंजर प्रो+ असं या दोन्ही गाड्यांची नावे आहेत. या बाईक अतिशय आकर्षक पद्धतीने डिझाईन करण्यात आल्या असून खास करून तरुणाईला तिची भुरळ पडेल हे नक्की… अगदी आरामदायी आणि कोणत्याही रस्त्यावर विना अडथळा तुम्ही हि इलेक्ट्रिक कृजर बाईक चालवू शकता. आज आपण या दोन्ही गाडयांच्या किमती, खास स्पेसिफिकेशन आणि रेंज याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

बॅटरी आणि रेंज –

रेंजर प्रो आणि रेंजर प्रो+ या दोन्ही इलेक्ट्रिक बाईक (Komaki Electric Cruiser Bike) मध्ये ४.२ किलोवॅटची लिपो ४ बॅटरी वापरण्यात आली आहे. यातील रेंजर प्रो बाईक एकदा फुल्ल चार्ज केली कि १६० ते २२० किमी पर्यंत अंतर आरामात पार करू शकते तर रेंजर प्रो+ सिंगल चार्जिंग वर १८० ते २४० किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते. शहरी रस्ते आणि महामार्ग दोन्हीसाठी हि बाईक बेस्ट ठरेल असं बोललं जातंय. महत्वाची आणि खास बाब म्हणजे या बाईक्स मध्ये ५०-लिटर स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. याशिवाय, त्यामध्ये मोबाइल चार्जिंग युनिट, पार्क असिस्ट, ऑटो रिपेअर स्विच, टर्बो मोड आणि रिअर प्रोटेक्शन गार्ड सारखी वैशिष्ट्ये देखील तुम्हाला मिळतात.

तसेच या बाईक्स मध्ये (Komaki Electric Cruiser Bike) टेलिस्कोपिक सस्पेंशन, ड्युअल डिस्क ब्रेक आणि बॅकरेस्टसह आरामदायी सीट्स आहेत. मागील बाजूला टेल लॅम्प गार्ड सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देखील आहेत. राइड सोपी आणि स्मार्ट बनवण्यासाठी, बाईकला फुल-कलर डिजिटल डॅशबोर्ड, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स असिस्ट आणि ब्लूटूथ साउंड सिस्टम देखील मिळते.

किंमत किती? Komaki Electric Cruiser Bike

यातील रेंजर प्रोची किंमत १.२९ लाख रुपये आहे तर रेंजर प्रो+ ची किंमत १.३९ लाख रुपये आहे. या किमतीत कंपनीकडून ग्राहकांना १२,५०० रुपयांच्या अॅक्सेसरीज देखील मिळत आहेत. कोमाकी इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या सह-संस्थापक गुंजन मल्होत्रा यांनी म्हंटल कि, कंपनीचे लक्ष नेहमीच पर्यावरणपूरक आणि शाश्वत गतिशीलता उपाय प्रदान करण्यावर राहिले आहे. त्यामुळेच रेंजर प्रो आणि प्रो+ या दोन्ही बाईक्स खास करून लांब पल्ल्याचा प्रवास, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि आरामदायी प्रवास कसा करता येईल हे लक्षात ठेऊनच तयार करण्यात आल्या आहेत.