Konkan Railway : कोकणची राणी, कोकण रेल्वे प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली आहे. दररोज हजारो प्रवासी कोकण रेल्वेने प्रवास करत असतात. 1990 साली कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway) ची स्थापना झाली होती. त्यानंतर आतापर्यंत कोकण रेल्वेची आगेकुच सुरूच आहे. मात्र आता कोकण रेल्वे कार्पोरेशनचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यात यावे अशी मागणी कोकण विकास समितीकडून करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र कोकण विकास समितीने कोकणातील सर्व आमदारांना पाठवले आहे.
काय आहे समितीचे म्हणणे ?(Konkan Railway)
खरंतर 1990 मध्ये बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड ची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये भारतीय रेल्वे 51%, महाराष्ट्र राज्य शासन 22 टक्के आणि कर्नाटक राज्य शासन 15%, गोवा राज्य शासन सहा आणि केरळ राज्य शासन 6% असा आर्थिक वाटा होता. जवळपास दहा वर्षांच्या कामकाजा नंतर कॉपरेशन भारतीय रेल्वेमध्ये विलिन होईल या अटीसह रोहा आणि मंगरूळ दरम्यान अस्तित्वात नसलेला रेल्वे मार्ग नियोजित भेद पूर्ण करण्याच्या उद्देशाने याची स्थापना करण्यात आली होती. मात्र आता 25 वर्षानंतर ही कोकण रेल्वेचा (Konkan Railway) कारभार वेगळाच सुरू असून केवळ नफ्याच्या जोरावर हे महामंडळ रेल्वे चालवण्यात इतर पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी लक्षणीय कामगिरी करू शकत नाही असं कोकण विकास समितीने म्हटलं आहे.
याबाबत माहिती देताना कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी सांगितले की भारतीय रेल्वेवरच जास्त प्रवासी वाहतूक असणाऱ्या मार्गांचे उच्च घनता मार्ग आणि अति गर्दीचा मार्ग असे वर्गीकरण केले जाते. यामध्ये मुंबई दिल्ली, मुंबई चेन्नई यासारख्या मार्गांचा समावेश होतो परंतु वर्षभर प्रवाशांची गर्दी असूनही कोकण रेल्वे मार्ग केवळ स्वतंत्र कारभारनमुळे या वर्गीकरणापासून मुकला आहे ज्यामुळे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांना अडथळा निर्माण होतो आहे.
म्हणून हवे विलीनिकरण…(Konkan Railway)
विलीनीकरण करण्याची मागणी करताना समितीकडून काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत:
- कोकण रेल्वेला विकास कामांसाठी इतर संस्थांकडून कर्ज घ्यावे लागते त्यामुळे महामंडळ त्यावर असलेल्या कर्जासहित भारतीय रेल्वेत विलीने करण्याची गरज आहे.
- कोकण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतुकीवर 40% आणि मालवाहतुकीवर 50% आधीभार आहे. कोकणातील प्रवास या इतर मार्गांवरील प्रवाशांपेक्षा जास्त भाडे देत असूनही हा प्रवासी सुविधांपासून वंचित आहे.
- आर्थिक मर्यादांमुळे मार्गाचे दुहेरीकरण सुविधा नवीनस्थानकस्थानकांवर फलाट (Konkan Railway) उभारणं यासारखे कामे करता येत नसल्यामुळे विलीनीकरण करणे आवश्यक आहे.