Konkan Railway : कोकण म्हंटल की डोळ्यासमोर निळाशार समुद्र आणि सफेद वाळू असं सगळं चित्र येतं. मात्र त्याहीपलीकडे जाऊन इथली संस्कृती इथले सण उत्सव याना विशेष महत्व आहे. ज्याप्रकारे कोकणातला गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे अगदी त्याचप्रमाणे कोकणातील आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा कोकणी लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात वसलेला कोकणी माणूस या यात्रेला हमखास हजेरी लावत असतो. म्हणूनच रेल्वे विभागाने यासाठी पुढाकार घेत खास व्यवस्था केली आहे.
खरंतर ही यात्रा यंदा 22 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडणार आहे.भराडी देवी ही (Konkan Railway) आंगणेवाडीतल्या आंगणे कुटुंबाची देवी आहे. मात्र या देवीच्या जत्रेसाठी सर्वांना प्रवेश असतो. शेतीचा एक हंगाम संपल्यानंतर आणि खरिपाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी ही जत्रा होते. दीड दिवस चालणाऱ्या भराडी देवीच्या जत्रेला दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख नागरिक सहभागी होतात.
कसे असेल रेल्वेचे वेळापत्रक ? (Konkan Railway)
उपलब्ध माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते सावंतवाडी रोड या स्थानकांदरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येतील.
कोकण रेल्वेच्या माहितीनुसार गाडी क्र. 01129 ही विशेष रेल्वेगाडी एलटीटीहून 21 फेब्रुवारी रोजी रात्री 12.55 वाजता सुटेल. सावंतवाडी रोड इथं ती दुपारी 12 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 01130 विशेष रेल्वेगाडी सावंतवाडी रोडहून 21 फेब्रुवारी – रोजी सायंकाळी 6 वाजता सुटून मुंबई एलटीटीला सकाळी 6.10 वाजता पोहोचेल.
वरील रेल्वेगाड्यांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, बोरत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा असेल. तर, या रेल्वेगाडीला एकूण 19 डबे असतील.
गाडी क्र. 01131 एलटीटी येथून 22 फेब्रुवारी रोजी रात्री 12.55 वाजता सुटणार असून, ती सावंतवाडी रोडला दुपारी 12 वाजता पोहोचेल. गाडी क्र. 01132 ही सावंतवाडी रोडवरून 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता सुटेल आणि एलटीटीला सकाळी 6.10 वाजता
पोहोचेल.
या स्थानकांवर घेणार थांबे (Konkan Railway)
22 डब्यांची ही रेल्वे ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबेल.