Konkan Tourist Places : उन्हाळ्यात कोकण का आहे पर्यटकांचे हॉटस्पॉट? गणपतीपुळे ते तारकर्ली काय खास आहे?

Konkan Tourist Places
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Konkan Tourist Places । सध्या सर्वत्र कडक उन्हामुळे अंगाची अक्षरशा लाहीलाही होत आहे. गर्मीपासून सुटका करण्यासाठी अनेकजण नवनवीन ठिकाणी तसेच समुद्रकिनारी ट्रिप काढतायत. महाराष्ट्रात पर्यटक खास करून कोकणात जात असतात….. खास करून पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक मंडळी आपल्या गाड्या कोकणाकडे वळवतात आणि अथांग समुद्रकिनारी आनंद घेतात…. दरवर्षी कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढतच असते. परंतु कोकणात असं आहे तरी काय? कोकण उन्हाळ्यात पर्यटकांचे हॉटस्पॉट का आहे? सर्वाना उन्हाळयात कोकणात का जाऊ वाटत? आणि कोकणात अशी कोणती पर्यटन स्थळे ज्याठिकाणी तुम्ही सैर करू शकता? याची सर्व माहिती आज आपण जाणून घेऊयात…

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोकण हा निसर्गसौंदर्य, सांस्कृतिक वारसा आणि साहसी पर्यटनाचा अनोखा संगम आहे. उन्हळ्यात, जेव्हा उष्णता त्रासदायक ठरते, तेव्हा कोकणातील स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीच्या बागा, आणि थंड हवेचा झुळझुळ वारा पर्यटकांना आकर्षित करतात. कोकणातील 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा, पांढरी वाळू, आणि निळ्याशार पाणी पर्यटकांना विदेशी समुद्रकिनाऱ्यांचा अनुभव देतात. सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, धबधबे, आणि घनदाट जंगले यामुळे कोकणात उन्हाळ्यातही सुखद वातावरण राहते.

कोकणात जाऊन तुम्ही किनारपट्टीवर साहसी खेळ सुद्धा खेळू शकता. तारकर्ली आणि मालवण येथे (Konkan Tourist Places) स्कूबा डायव्हिंग, जेट स्कीइंग, पॅरासेलिंग, आणि बोटिंग यांसारखे साहसी खेळ पर्यटकांना आकर्षित करतात. तारकर्लीतील स्कूबा डायव्हिंग केंद्र पर्यटकांना समुद्रातील प्रवाल, मासे, आणि जलचरांचे अद्भुत दर्शन घडवते.कोकणचे वातावरण उन्हाळ्यात शांत आणि सुखद असते, ज्यामुळे पर्यटक येथे आरामदायी सुट्टीचा आनंद घेतात.

कोकणात अनेक धार्मिक स्थळे सुद्धा आहेत आणि कोकणी माणसाने सांस्कृतिक वारसा सुद्धा जपलाय… कोकणात पर्यटकांचा ओघ वाढण्याचं हे एक कारण आहे…. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिर हे कोकणातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. 400 वर्षांपूर्वीची ही मूर्ती आणि समुद्रकिनारी असलेले मंदिर पर्यटकांना आध्यात्मिक शांती देते. याशिवाय कुणकेश्वर मंदिर, परशुराम मंदिर, आणि कनकादित्य सूर्य मंदिर यांसारखी धार्मिक स्थळे कोकणाच्या सांस्कृतिक वैभवात भर घालतात.

कोकणातील प्रमुख पर्यटनस्थळे कोणती? Konkan Tourist Places

1) गणपतीपुळे-
गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिर हे कोकणातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. 400 वर्षांपूर्वीची ही मूर्ती आणि समुद्रकिनारी असलेले मंदिर पर्यटकांना आध्यात्मिक शांती देते. गणपतीपुळे बीच वरही तुम्ही आनंद घेऊ शकता. याठिकाणी तुम्हला शांत वातावरण अनुभवता येईल. गणपतीपुळे पासून 10 किमी आरे-वारे बीच सुद्धा आहे ज्याठिकाणीही तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

२) मालवण (सिंधुदुर्ग)
साहसी आणि सांस्कृतिक पर्यटनासाठी मालवण प्रसिद्ध आहे. मालवणी खाद्यसंस्कृती आणि समुद्रकिनाऱ्यांचे आकर्षण इतकं मोठं आहे कि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मालवणला जातात. मालवण बीच, सिंधुदुर्ग किल्ला, रॉक गार्डन, चिवला बीच हि येथील प्रमुख आकर्षणे आहेत. तुम्हाला मालवण मध्ये बोटिंगचा जबरदस्त अनुभव घेता येईल. तसेच मालवणी थाळीचा आस्वाद तुमच्या पोटाला खुश करेल.

३) हर्णे-दापोली (रत्नागिरी)
हर्णे-दापोली मध्ये पर्यटकांना शांत समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक स्थळे पाहायला मिळतील. दापोलीला “मिनी महाबळेश्वर” सुद्धा म्हणतात. हर्णे बीच वर तुम्ही चांगल्या दर्जाचे मासे मनसोक्त खाऊ शकता. याशिवाय, पन्हाळेकाजी लेणी, सुवर्णदुर्ग किल्ला, केळशी आणि लाडघर बीच, या ठिकाणाना सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता.

४) तारकर्ली (सिंधुदुर्ग)
स्वच्छ पाण्याचा समुद्रकिनारा आणि साहसी खेळांचे केंद्र म्हणून तारकर्ली बीच ओळखला जातो. स्कूबा डायव्हिंगसाठी हे भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. सिंधुदुर्ग किल्ला, देवबाग बीच, सागरी संग्रहालय या जवळच्या परिसरात तुम्ही भेट देऊ शकता… तसेच मालवणी मासळी थाळीचा आस्वाद सुद्धा घेऊ शकता.