Bank Loan वसुलीचे नियम काय आहेत ??? बँकेच्या एजंटने कर्जाच्या वसुलीसाठी धमकावल्यास त्वरित करा ‘हे’ काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : आपल्या आयुष्यात आणीबाणीच्या अनेक प्रसंगी आपल्याला पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत लोकं बँकेकडून कर्ज घेतात. ज्यावर त्यांना व्याजही द्यावे लागते. मात्र, काही वेळा असेही प्रसंग येतात जेव्हा लोकं बँकांकडून घेतलेले कर्ज फेडू शकत नाही. अशा परिस्थितीत बँकांकडून कर्जाच्या वसुलीसाठी रिकव्हरी एजंट पाठवले जातात. अनेकदा हे एजंटकडून कर्जदाराला धमकावले जाते. तसेच कर्जाचे पैसे घेण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला जातो. अशा परिस्थितीत, रिकव्हरी एजंटशी संबंधित काही नियम आहेत, ज्याची माहिती लोकांकडे असणे महत्वाचे ठरेल.

Education Loan vs Personal Loan: Where to bet to fund your higher studies?  | Mint

RBI कडून आता कर्ज वसुलीबाबतचे नियम कडक करण्यात आले आहेत. तसेच बँकांनाही त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे, जर रिकव्हरी एजंट एखाद्याला कर्ज वसूल करण्यासाठी धमकावत असेल तर लोकांनाही त्याबाबत काही कायदेशीर अधिकार देण्यात आले आहेत. ज्याबाबतची माहिती लोकांना असली पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती कर्जाची परतफेड करत नाही, तेव्हा त्याला बँकेकडून पहिली नोटीस पाठवली जाते. Bank Loan

HDFC बैंक से पर्सनल लोन लेने का आसान तरीका - BankShiksha

काही प्रकरणांमध्ये,रिकव्हरी एजंट्सकडून ग्राहकांशी संपर्क साधला जातो. अशा परिस्थितीत अनेकदा हे रिकव्हरी एजंट ग्राहकांशी गैरवर्तन करतात आणि त्यांना धमकावतात. त्याबाबत सर्वात लोकं पोलिसांकडे तक्रार करू शकतात. तसेच नियमांनुसार कर्जाची परतफेड केले नसल्याची बाब सिव्हिल केसेसमध्ये येते, अशा परिस्थितीत एजंट्सना थकबाकीदारांसोबत दादागिरी करता येणार नाही. Bank Loan

RBI moves to restrict bank exposure to corporate loans

कर्जाच्या वसुलीसाठी, बँकेचे अधिकारी किंवा रिकव्हरी एजंट डिफॉल्टरला सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेतच कॉल करू शकतात. तसेच, कर्जाच्या संदर्भात डिफॉल्टरच्या घरी जाण्याची वेळही तीच आहे. जर बँकेचे अधिकारी किंवा वसुली एजंट्सनी या वेळेशिवाय इतर कोणत्याही वेळी फोन केला किंवा घरी आले तर कर्जदारांना याबाबत पोलिस किंवा RBI कडे तक्रार दाखल करता येईल. Bank Loan

Breaking the Rules: Uncovering the Dark Side of Loan Recovery Agencies

हे लक्षात घ्या कि, जेव्हा कर्जाचे दोन EMI भरले जात नाहीत तेव्हा बँकेकडून दोन रिमाइंडर लेटर पाठवले जातात. तसेच यानंतरही जर EMI भरला गेला नाही तर बँकेकड्न कायदेशीर नोटीस पाठवली जाईल. यासोबतच बँकेकडून कर्ज घेणा-या व्यक्तीला डिफॉल्टर म्हणूनही घोषित केले जाऊ शकते. तसेच नोटीस दिल्यानंतर रिकव्हरी एजंटमार्फत कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडून वसुलीची प्रक्रिया देखील सुरू केली जाऊ शकेल. Bank Loan

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/NotificationUser.aspx?Id=4141&Mode=0

हे पण वाचा :
IRCTC App द्वारे ऑनलाइन तिकीट बुकिंगची प्रक्रिया जाणून घ्या
एका Credit Card चे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरा, फॉलो करा ‘या’ 3 स्टेप्स
आता Visa शिवाय ‘या’ देशांत मिळणार प्रवेश, सर्वात स्वस्त देश कोणता ते पहा
Voter ID-आधार लिंकिंगसाठी सरकारकडून देण्यात आली मुदतवाढ
’31 मार्चपर्यंत बँकांना सुट्टी नाही, रविवारीही होणार कामकाज’ – RBI चा आदेश