हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेकडून प्रवाश्यांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. अशातच जर आपण प्रवास करण्याची योजना आखत असाल तर IRCTC द्वारे तिकीट बुक करता येईल. हे लक्षात घ्या कि, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने रेल्वे प्रवाशांसाठी ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंगची प्रक्रिया अगदी सोपी बनवली आहे. आता प्रवाश्यांना आयआरसीटीसीची वेबसाइट किंवा आयआरसीटीसी अॅपद्वारे ऑनलाइन तिकीट बुक करता येतील. त्याचप्रमाणे पेटीएम, मेक माय ट्रिप यांसारख्या ट्रॅव्हल बुकिंग वेबसाइटवरूनही तिकिटे बुक करता येतील.
मात्र, ऑनलाइन तिकीट बुक करण्यापूर्वी प्रवाशांना IRCTC खाते तयार करावे लागेल. जर आपल्याकडे IRCTC खाते नसेल, तर आज आपण IRCTC खाते तयार करून ऑनलाइन तिकीट कसे बुक करायचे ते जाणून घेउयात…
अशा प्रकारे तयार करा IRCTC खाते
1. IRCTC वेबसाइट http://www.irctc.co.in वर जा.
2. वरील टॅबमधून रजिस्ट्रेशनच्या पर्यायावर क्लिक करा.
3. आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल, त्यात User Name, Password, Security Question, Security Answer टाका आणि भाषा निवडा.
4. पर्सनल डिटेल्स खाली देणे आवश्यक आहे. जसे पूर्ण नाव, लिंग, जन्मतारीख, व्यवसाय, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर भरावा लागेल.
5. या खाली रजिस्टर्ड ऍड्रेस टाकावा लागेल.
6. सर्व माहिती भरल्यानंतर खालील नियम आणि अटींवर क्लिक करा.
7. रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल. OTP टाकून सबमिट केल्यानंतर आपले खाते तयार होईल.
अशा प्रकारे ऑनलाईन तिकीट बुक करा
सर्वात आधी IRCTC खात्यामध्ये लॉग इन करा.
त्यानंतर, प्रवासाच्या तारखेसह निघण्याचे ठिकाण आणि पोहोचायचे ठिकाण निवडा.
यानंतर प्रवासाचा वर्ग निवडा जसे की, 1st AC, 2nd AC, 3rd AC, स्लीपर निवडा.
उपलब्ध गाड्या आणि वेळा तपासण्यासाठी “Search Train” वर क्लिक करा.
यानंतर ज्या ट्रेनमध्ये प्रवास करायचा आहे ती निवडा आणि “Check Availability & Fare” वर क्लिक करा.
कोटा निवडा (जसे की सामान्य, तत्काळ, महिला इ.) आणि “Book Now” वर क्लिक करा.
आता प्रवाश्याचे तपशील (जसे की नाव, वय, लिंग आणि बर्थ प्राधान्य) एंटर करा आणि “Continue Booking” वर क्लिक करा.
आता बुकिंग डिटेल्स Review करा आणि “Make Payment” वर क्लिक करा
पेमेंट पद्धत निवडा (जसे की क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा ई-वॉलेट) आणि पेमेंट डिटेल्स एंटर करा.
बुकिंग पूर्ण करण्यासाठी “Make Payment” वर क्लिक करा
पेमेंट पूर्ण झाल्यावर, तिकिटाच्या तपशीलांसहीत एक कन्फर्मेशन मेसेज आणि ईमेल मिळेल.
हे पण वाचा :
DBS Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा
गेल्या 2 वर्षांत ‘या’ Penny Stock ने गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवून मिळवा अनेक फायदे !!!
IDBI Bank ने लाँच केली स्पेशल FD, नवीन व्याज दर तपासा
IQOO Neo 7 5G स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लॉन्च, किंमत अन् फीचर्स जाणून घ्या