धक्कादायक ! लग्नास नकार दिला म्हणून तरूणी आणि तिच्या आईने तरूणाला जिवंत जाळलं

छत्तीसगढ : वृत्तसंस्था – छत्तीसगढच्या कोरिया जिल्ह्यातील वैकुंठपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका मुलीने आणि तिच्या आईने एका तरूणाला जिवंत जाळलं आहे. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 18 ऑगस्ट रोजी वेदप्रकाश गंभीरपणे भाजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. यानंतर त्याला वेकुंठपूर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर त्याला रायपूरला शिफ्ट करण्यात आले. याच उपचारारम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

रायपूरहून परत आल्यावर मृत वेदप्रकाशच्या परिवाराने पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली. त्यांनी सांगितले कि, वेदप्रकाशचा मृत्यू पूजा प्रधान आणि तिच्या आईने पेट्रोल टाकून जाळल्यामुळे झाला आहे. यानंतर वेदप्रकाश याने मारण्याअगोदर दिलेल्या जबाबानुसार, पूजा प्रधानसोबत त्याची आधीपासून मैत्री होती. घटनेच्या दिवशी पूजाने त्याला घरी बोलवलं होतं. त्यावेळी तिची आई सुद्धा घरात होती. दोघींनी मृत वेदप्रकाशवर दबाव टाकला आणि ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केली होती.

यानंतर मृत वेदप्रकाशने लग्न करण्यास नकार दिल्याने पूजा आणि तिच्या आईने पेट्रोल टाकून त्याला जाळलं.यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी एक टीम आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठवली. त्यांच्या घरी जाऊन पाहिलं तर घटनेच्या दिवसापासूनच दोघीही फरार आहेत. तपासादरम्यान असे समजले कि, दोन्ही आरोपी महिला तलवापरा येथे आढळून आल्या होत्या. यानंतर पोलिसांनी एक टीम त्या ठिकाणी पाठवली आणि त्या दोघीना अटक केली. आरोपी पूजा प्रधान आणि तिची आई प्रमिला प्रधान यांनी पोलीस चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला आहे.