भिडे-एकबोटेंवर कारवाईचे संकेत; कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही- जयंत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे (Sambhaji Bhide, Milind Ekbote) यांच्यावर कारवाई करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्यात. त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री यांनी प्रतिक्रिया दिलीय. ”जे पुरावे पुढे येतील, त्या पद्धतीने कारवाई होईल, यात कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असं जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी (Jayant Patil)स्पष्ट केलेय. जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. (Koregaon-Bhima Violence Case)

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. याबाबत राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना विचारण्यात आले. जे पुरावे समोर येतील त्या पद्धतीने कारवाई होईल, यात कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नसल्याचे स्पष्ट केलेय. चंद्रकांत पाटील यांच्याबाबत पत्रकारांनी जयंत पाटलांना विचारणा केली, त्यावर ते म्हणाले मला चंद्रकांत पाटील यांच्यापुरते मर्यादित ठेवू नका. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, असे उत्तर देत चंद्रकांत पाटील यांना थोडी विश्रांती दिली पाहिजे, असा उपरोधिक टोला देखील जयंत पाटलांनी लगावला.

दरम्यान, कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. या प्रकरणी अद्याप दोघांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 1 जानेवारीला पुण्यात दिली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment