हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kotak Mahindra Bankकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. हे लक्षात घ्या कि, हे 2 कोटी रुपयांपेक्षा कमी कालावधीसाठी लागू असेल. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑगस्ट 2022 पासून हे नवीन दर लागू करण्यात आलेले आहेत. बँकेकडून विविध कालावधीच्या FD वरील व्याजदरही वाढवले गेले आहेत.
ज्यानुसार आता Kotak Mahindra Bank नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 2.50 टक्के ते 5.90 टक्के दराने व्याज देईल. तसेच ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के व्याज दिले जाईल. कोटक महिंद्रा बँकेने वेगवेगळ्या कालावधीच्या FD वर वेगवेगळे दर वाढवले आहेत. त्याच वेळी, काही कालावधीसाठीच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. चला तर मग कोणत्या FD वर बँकेचे किती व्याज वाढले आहेत ते जाणून घेऊयात…
बँकेच्या एफडीवरील नवीन व्याजदर
Kotak Mahindra Bank कडून 7-14 दिवसांच्या मुदतीच्या FD वर पूर्वीप्रमाणे 2.50 टक्के व्याज दिले जाईल. तर 15-30 दिवसांच्या एफडीवरील व्याजदर 2.50 टक्क्यांवरून 2.65 टक्के करण्यात आला आहे. याशिवाय 31-90 दिवसांच्या FD वर बँक 3 टक्क्यांऐवजी 3.25 टक्के दराने व्याज देईल. त्याच बरोबर 91-179 दिवसांच्या FD वर बँक 3.50 टक्क्यांऐवजी 3.75 टक्के व्याज देईल. आता बँक 180 ते 363 दिवसांच्या FD वर 4.75 ऐवजी 5 टक्के व्याज देईल. इथे हे जाणून घ्या कि, बँकेने 364 दिवसांच्या एफडीवरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.
365 दिवसांच्या मुदतीच्या एफडीवरील वाढलेले व्याजदर
Kotak Mahindra Bank कडून 365 ते 389 दिवसांच्या एफडीवरील व्याज दर 5.60 टक्क्यांवरून 5.75 टक्के करण्यात आलेला आहे. तसेच 390 दिवस आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर बँक 5.75 टक्क्यांऐवजी 5.85 टक्के व्याज देईल. त्याच वेळी, 3 वर्षे आणि 10 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर, बँक आधीप्रमाणेच 5.90 टक्के व्याज दर देईल. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना सामान्य एफडी खातेधारकापेक्षा 0.50 टक्के जास्त व्याज मिळेल.
RBI ने रेपो दरात वाढ केल्याचा परिणाम
RBI कडून पुन्हा एकदा रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बँका कर्जावरील व्याजदर वाढवण्यासोबतच एफडी आणि बचत खात्यावरील व्याजदरातही वाढ करत आहेत. Kotak Mahindra Bank व्यतिरिक्त, येस बँक आणि श्रीराम सिटी युनियन फायनान्सने देखील आजपासून आपल्या FD च्या व्याजदरात बदल केले आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://www.kotak.com/en/personal-banking/deposits/fixed-deposit/fixed-deposit-interest-rate.html
हे पण वाचा :
EPFO कडून PF पैकी किती रक्कम शेअर्समध्ये गुंतवली जाते ??? ते जाणून घ्या !!!
FD Rates : श्रीराम सिटी युनियनने आपल्या FD वरील व्याजदरात केली वाढ !!!
Multibagger Stock : गेल्या 21 वर्षात ‘या’ शेअर्सद्वारे गुंतवणूकदारांनी मिळवले कोट्यवधी रुपये !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजच्या किंमती पहा