IOC च्या भागीदारीत कोटक महिंद्रा बँकेने लाँच केले को-ब्रँडेड इंधन क्रेडिट कार्ड

नवी दिल्ली । देशभरात सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी सर्वांनाच हैराण केले आहे, मात्र तुम्हाला काही लिटर पेट्रोल आणि डिझेल फ्री मध्ये दिले गेले किंवा तुम्हाला कॅशबॅक दिला गेला तर तुम्ही काय म्हणाल? होय, हे खरे आहे. पेट्रोल आणि डिझेल खरेदी करताना तुम्ही फ्युएल क्रेडिट कार्ड्स द्वारे तुमचे पैसे वाचवू शकता. बाजारात अनेक फ्युएल क्रेडिट कार्ड्स उपलब्ध आहेत. यामध्ये, खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँक आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी शुक्रवारी इंडियन ऑइल कोटक को-ब्रँडेड इंधन क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपची घोषणा केली.

या टाय-अपमुळे, ग्राहकांना एक चांगला रिवॉर्ड प्रोग्रॅम बघायला मिळेल. यामध्ये ग्राहकांना इंधनाचा वापर आणि गैर-इंधन आणि वारंवार खर्च करणार्‍या श्रेणींवर, जसे की जेवण आणि किराणा सामानावर चांगले रिवॉर्ड मिळतील.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक (रिटेल ट्रान्सफॉर्मेशन) संदीप मक्कर म्हणाले, “आम्ही कोटक महिंद्रा बँकेसोबतच्या सहकार्याबद्दल खूप उत्सुक आहोत. इंडियन ऑइलचा आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य देऊन इंधन भरण्याचा अनुभव बदलण्यावर ठाम विश्वास आहे.”

मक्कर म्हणाले की,”ही पार्टनरशिप इंडियन ऑइल आणि कोटक महिंद्रा बँकेला आपल्या ब्रँडची पोहोच आणखी मजबूत करण्यास आणि ग्राहकांशी जोडण्यास मदत करेल. इंडियन ऑइलच्या 33,000 हून अधिक इंधन केंद्रांपैकी 98 टक्क्यांहून जास्त क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि वॉलेट पेमेंट स्वीकारतात.”