सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात बुधवारी २.७ रिश्टर स्केल क्षमतेचा भुकंपाचा धक्का बसला आहे. सातारा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्कयाची तीव्रता २.७ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे. या भूकंपाच्या धक्क्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १३.६ किलोमीटर पुढे वारणा खोऱ्यात होता. या भुकंपाच्या धक्क्याने कोणत्याही प्रकारची वित्त अथवा जीवित हानी झाली नसल्याचे कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी सांगितले. हा भूकंपाचा धक्का बसला अचानक बसल्याने नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. आपल्या सुरक्षेसाठी लोक धावपळ करत होते. भूकंपाचे अजून धक्के बसतात कि काय या भीतीमुळे नागरिकांमध्ये अजून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.