कोयना धरण परिसरात 2.9 रिश्टर स्केलचा भुकंप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात रात्री 9.33 वाजता भूकंपाचा  सौम्य धक्का जाणवला आहे. भूकंपाची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली असून यात कोणतीही झाली नसल्याचे समजत आहे. या भूकंपामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोयना धरणाच्या परिसरात नेहमी भूकंपाचे धक्के जाणवत असता. याआधी ५ जुलै रोजी वारणा खोऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. आज च्या भूकंपाचा केंद्र बिंदू कोयना धरणापासुन उत्तरेला वारणाखोर्यात 17.36 किलोमीटरवर असून भुकंपाची जमिनीत खोली 10 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती मिळाली आहे. भुकंपाने कोणतीही हानी झाली नसलेचे सांगण्यात आले आहे.

IMG-20200719-WA0012.jpg

वारणा खोऱ्यात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोयना धरणाला यापासून कोणताही धक्का नसल्याचंही सांगण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरू नये, असंही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment