मनोरुग्ण वैद्यकीय अधिकाऱ्याकडून हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राची तोडफोड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कोयना विभागातील हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रांत निवासी वैद्यकीय आधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉ. सुप्रीम कांबळे यांनी आरोग्य केंद्राच्या इमारतीची तोडफोड केल्याचा प्रकार नुकताच घडला. या प्रकरणी त्यांच्यावर कोयना पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील कोयना विभागातील हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रांत गेल्या अनेक दिवसापासून निवासी वैद्यकीय आधिकारी म्हणून डॉ. सुप्रीम कांबळे हे काम पाहत आहे. दरम्यान त्यांनी आरोग्य केंद्राच्या इमारतीची तोडफोड तोडफोड केली. यामध्ये इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले. या प्रकरणी तालुका वैद्यकीय आधिकारी प्रमोद खराडे व वैद्यकीय आधिकारी इंदीरा भिंगारदिवे यांनी कोयना पोलीसात तक्रारही दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याला ताब्यात घेतली.

संबंधित तालुका वैद्यकीय आधिकारी प्रमोद खराडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, या वैद्यकीय अधिकाऱ्याला मनोरुग्णांचे झटके येत असुन तो मनोरुग्ण आहे. त्याला आलेल्या झटक्याने त्याने हे कृत्य केले आहे. हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रांत दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. निवासी वैद्यकीय आधिकारी या पदावर कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी हे गत चार महिन्यापासून मनोरुग्ण बनले आहेत. त्यांना सतत येणाऱ्या वेडाच्या झटक्यातून त्यांच्या कडून नेहमीच चुकीच्या घटना घडत आहेत. २९ मार्च रोजी सांय ८.३० वाजता आलेल्या वेडाच्या झटक्यातून मनोरुग्ण वैद्यकीय अधिकाऱ्याने हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तोडफोड करून धिंगाणा घातला आहे.

यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचारासाठी दाखल असणाऱ्या रुग्णात घबराट पसरली आहे. या घटनेची तक्रार तालुका वैद्यकीय अधिकारी प्रमोद खराडे व वैद्यकीय आधिकारी इंदिरा भिंगारदिवे यांनी कोयना पोलिसात दाखल केली आहे. कोयना पोलिसांनी मनोरुग्ण वैद्यकीय अधिकारी सुप्रिम कांबळे याला ताब्यात घेतले आहे.

Leave a Comment