मौलाना हे भारतीय संविधानापेक्षा मोठे आहेत का? क्रांती रेडकर संतापल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लीम च आहेत असा खळबळजनक गौप्यस्फोट मौलाना मुज्जमील अहमद यांनी केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भारतीय संविधानापेक्षा मौलाना मोठे आहेत का? असा सवाल क्रांती रेडकर यांनी केला आहे.

भारतीय संविधानापेक्षा मौलाना मोठे आहेत का? असं विधान केले आहे. मलिकांनी निकाहनामा जारी केल्यावर समीर वानखेडे यांनी मी धर्म बदलला आहे का? मी जन्माने हिंदू आहे आणि आताही आहे. मुस्लीम मुलीशी लग्न केल्याने मुस्लीम होतो का? असा सवाल केला आहे.

मौलाना नेमकं काय म्हणाले-

समीर वानखेडे हे मुस्लीम होते म्हणूनच त्यांचा निकाह करण्यात आला असे मौलाना मुज्जमील अहमद यांनी म्हंटल आहे. तसेच समीर यांची आई आणि वडील हे पण मुस्लीमच होते, सर्व मुस्लीम असल्यावरच निकाह होतो असेही त्यांनी म्हंटल. तसेच जेव्हा निकाह लावला तेव्हा समीर यांच्या वडिलांचे नाव हे दाऊद हेच होते असेही त्यांनी सांगितले.