हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या (Santosh Deshmukh Murder Case) खटल्यात प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी आज पहिल्यांदा युक्तिवाद केला. बीड मकोका न्यायालयात झालेल्या या सुनावणीत उज्ज्वल निकम यांनी एक महत्त्वाचा पुरावा न्यायालयासमोर मांडला. उज्ज्वल निकम यांनी सीडीआरचा मुद्दा उपस्थित करत वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला तीनवेळा फोन केल्याची माहिती सीडीआर मधून समोर आलीय. त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेलाय. 32 मिनिट्यांच्या युक्तीवादातून उज्ज्वल निकम यांनी खंडणी प्रकरण, मारहाण आणि हत्या प्रकरणाचा पूर्ण घटनाक्रम सांगितला.
वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या 28 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबरला बैठका झाल्या होत्या. या सगळ्या गोष्टी पोलिसांनी आरोपपत्रात मांडल्या होत्या. परंतु पोलिसांच्या चार्डशीट मध्ये एक गोष्ट नव्हती. ती म्हणजे सीडीआर. हाच सीडीआरचा मुद्दा उज्ज्वल निकम यांनी आज न्यायालयात मांडला. सीडीआरचा महत्त्वाचा मुद्दा हा आरोपपत्रापेक्षा वेगळा आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, कृष्णा आंधळे याने फरार असताना वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याला ३ वेळा फोन केला होता. हा महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. या सीडीआर रिपोर्टमुळे संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचा थेट सहभाग असल्याचं समोर आले आहे.
उज्ज्वल निकम यांच्या युक्तिवादामधील महत्त्वाचे मुद्दे-
उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद करताना तिरंगा हॉटेलमधील बैठकीचा तपशील कोर्टासमोर सांगितला. शिवाय सुदर्शन घुलेने आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला केलेली मारहाण आणि घटनेचा संपूर्ण तपशील कोर्टाला सांगितला. 6 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे, हे साडेबारा वाजता आवाजा कंपनीच्या मसाजोग येथील ऑफिसमध्ये आले. सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली मारहाण केली. त्यावेळी शिवाजी थोपटे बाहेर आले. यावेळी सुदर्शन घुले यांनी सांगितले दोन कोटीची मागणी पूर्ण करा किंवा काम बंद करा. यासंदर्भात माहिती सरपंच संतोष देशमुख यांना कोणीतरी दिली. हा वाद मिटवण्यासाठी संतोष देशमुख व गावातील काही लोक त्याठिकाणी गेली. यावेळी सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली.
वाल्मिक कराड याच्या सांगण्यारुन आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली. वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासण्यात आले असून आवाजाची ओळख पटवण्यात आली आहे.या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडने इतर आरोपींना मार्गदर्शन केल्याचं कोर्टाला सांगण्यात आलं. 7 डिसेंबर 2024 रात्री आठ वाजता वाल्मीक कराड याला घुले यांनी फोन केला. फोनवर घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. यावेळी कराड यांनी अडथळा आणतील त्यांना संपवा असे सांगितले, असं सांगितल्याचा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केला.