कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराडसह सातारा जिल्ह्यातील माता, भगिनी स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात आणि महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्था प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक डॉ. अतुल भोसले यांनी केले. पतसंस्थेच्या विंग (ता. कराड) शाखेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा सुरेश भोसले यांच्या हस्ते आणि डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कृष्णा महिला पतसंस्थेच्या विंग शाखेचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव शिंदे, सयाजी यादव, पंचायत समिती सदस्य सौ. नंदा यादव, सचिन पाचुपते, सुरेश शिंदे, संपतराव खबाले, धनाजी कणसे, धनाजीराव पाटील, पतसंस्थेच्या चेअरमन अलका जाधव, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील,यावेळी सचिन तोडकर, धनंजय पाटील, राजेंद्र खबाले, भागवत कणसे, पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन सौ. सरिता पाटील, संचालिका जयश्री निकम, उज्वला पाटील, रंजना पाटील, सुरेखा पिसाळ, भाग्यश्री कणसे, भारती जगताप, मीना पवार, राजश्री थोरात, सुरेखा गोरे, ऊर्मिला बडे, मंदाकिनी वाघमारे यांच्यासह सभासद, ग्राहक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. भोसले पुढे म्हणाले, कृष्णा महिला पतसंस्था गेली १५ वर्षे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे काम करत आहे. महिलांनी उभारलेल्या अनेक लघु उद्योगांना आम्ही सातत्याने सहकार्य केले आहे. संस्थेचा आजअखेर ३२ कोटींचा एकूण व्यवसाय झाला असून, येत्या मार्चअखेर ५० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. तसेच कृष्णा आर्थिक परिवाराचा १५०० कोटींहून जास्त एकत्रित व्यवसाय टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. कृष्णा बँकेचे माजी संचालक हेमंत पाटील यांनी प्रास्तविक केले. पतसंस्थेचे व्यवस्थापक हेमंत पाटील यांनी आभार मानले.