Krushi Sakhi Yojana | केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक नवनवीन योजना येत असतात. महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार अनेक महत्त्वाची पावले देखील उचलत आहेत. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढलेला आहे. महिलांची सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात देखील प्रगती होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजना आणत आहेत. त्याचप्रमाणे महिलांना एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील मदत केली जाते.
आपल्या भारतामध्ये कृषी क्षेत्रामध्ये पुरुषांसोबत महिलांचे ही प्रमाण वाढलेले आहे. आता कृषी क्षेत्रामध्ये महिलांनी स्वावलंबी बनून चांगले उत्पन्न घ्यावे. आणि चांगला व्यवसाय करावा. या दृष्टीने केंद्र सरकारने महिलांसाठी कृषी सखी योजना (Krushi Sakhi Yojana ) आणलेली आहे. ही योजना सरकार देशातील जवळपास 30,000 कृषी सखींना प्रमाणपत्र देऊन पूर्ण करणार आहे.
काय आहे कृषी सुखी योजना ? | Krushi Sakhi Yojana
सरकारच्या या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात राहणाऱ्या स्त्रियांना त्याचप्रमाणे इतर शेतकऱ्यांना देखील शेतातील उत्पादन वाढवण्यास कशी मदत करता येईल. याबद्दलचे प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये पिकाचे उत्पादन कसे घ्यावे? तसेच बाकी सगळ्या गोष्टी कशा पहाव्यात. या सगळ्याची माहिती दिली जाणार आहे.
या योजनेमध्ये भाग घेतल्यानंतर तुम्हाला संपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल. आणि त्याचे प्रमाणपत्र देखील दिले जाईल. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्ही कृषी सखी म्हणून काम करू शकता. यासाठी महिलांना एका विषयाचे 56 दिवस प्रशिक्षण घ्यावे लागेल. आणि त्याची परीक्षा देखील द्यावी लागेल. तुम्ही ही परीक्षा पास झाला तरच तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत 12 राज्यांची निवड करण्यात आलेली आहे. या ठिकाणी महिलांना प्रशिक्षण दिले जाते.