हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Krushi Samruddhi Yojana। विधानभवनात रमी खेळल्याच्या आरोपाखाली चर्चेत असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी आज पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांसाठी नवीन योजना लाँच केली आहे. कृषी समृद्धी योजना असं या योजनेचे नाव असून बळीराजाची उत्पादकता वाढवणे, हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे यांसारखे उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हि योजना सुरु करण्यात आली आहे. खरं तर या योजनेची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती, मात्र अधिकृत जीआर आज जारी करण्यात आला.
पत्रकार परिषदेत बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी समृद्धी योजना (Krushi Samruddhi Yojana) आपण लॉन्च करत आहोत या योजनेमुळे कृषिक्षेत्रात गुंतवणूक वाढणार आहे तसेच शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फायदा होईल असं कोकाटे म्हणाले.
कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश – Krushi Samruddhi Yojana
१) कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे
२) उत्पादन खर्च कमी करणे
३) उत्पादकता वाढवणे
४) पीक विविधीकरण करणे
५) मूल्य साखळी बळकट करणे
६) हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे
७) शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे (Krushi Samruddhi Yojana)
कोणकोणत्या घटकांचा समावेश –
पाणी व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचन
मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि जमीन संसाधन विकास
हवामान अनुकूल बहुपीक पद्धतीचा वापर
मूल्य साखळी विकास आणि काढणी पश्चात पायाभूत सुविधा
उपजीविका विविधीकरण आणि संलग्न उपक्रम
संस्थात्मक बळकटीकरण
ज्ञान, संशोधन आणि प्रात्यक्षिक
कोल्ड स्टोरेज
मला रमी खेळताच येत नाही –
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रमी खेळतानाचा विडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही जोर धरू लागली. परंतु मला रमी खेळता येत नाही. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एक रुपयाची रमी खेळलो नाही. मी मोबाईल उघडताच तो गेम आला. तो स्किप करता आला नाही. त्यामुळे हे सर्व आरोप खोटे आहेत, बिनबुडाचे आरोप आहेत. माझी राज्यभरात बदनामी झाली आहे. ज्या ज्या राजकीय नेत्यांनी माझी बदनामी केली त्यांना मी कोर्टात खेचणार आहे असा उलट इशारा माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांना दिला.




