Krushna Election Result : पहिल्या फेरीत सहकार पॅनल 5500 मतांनी आघाडीवर; पहा ताजे अपडेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत सहकार पॅनेलने मोठी आघाडी घेतली आहे. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील सहकार पॅनेलचे विलास ज्ञानू भंडारे (टेंभू) यांनी 5 हजार पाचशे 46 मतांची आघाडी घेतली आहे. कृष्णा कारखान्याच्या मतमोजणी चा पहिला कल पहिल्या फेरीतील जाहीर केला.  त्यामध्ये एकूण 17 हजार 290 मतापैकी 16 हजार 968 मध्ये वैद्य तर 322 मध्ये अवैद्य झालेले आहेत.

पहिल्या फेरीत फेरीत मिळालेली मते पुढीलप्रमाणे सहकार पॅनेल विलास ज्ञानू भंडारे टेंभू दहा हजार 169 संस्थापक पॅनेल शिवाजी उमाजी अवे शिरटे 4623 धिकराव लक्ष्‍मण भंडारे टेंभू 2176 अशी मते मिळाली असून अद्याप दुसरी फेरी ची मतमोजणी बाकी आहे.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला आज सकाळी सुरवात झाली आहे. तिन्ही पॅनेलचे 21 जागेवर उमेदवार यांच्यात चुरशीची लढत झाली असून निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पहिल्या फेरितील मतमोजणीला सुरवात झाली असून जयवंतराव भोसले सहकार पॅनलला प्राथमिक कल दिसून येत आहे.

सध्या चाललेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे आघाडीवर आहेत. सहकार पॅनेलचे मागासवर्गीय प्रवर्गातून वसंतराव बाबुराव शिंदे (विंग), भटक्या जाती / जमाती, अविनाश मधुकर खरात (खरातवाडी) यांनी आघाडी घेतली आहे.

तसेच पहिल्या फेरीत केल्या जात असलेल्या मतमोजणीत रयत पॅनेलचे
अनुसूचित जाती जमाती राखीवमधील उमेदवार अधिकराव लक्ष्मण भंडारे (टेंभू), इतर मागास प्रवर्ग राखीव : शंकरराव ज्ञानदेव रणदिवे (कासेगाव), भटक्या विमुक्त जाती जमाती राखीव: आनंदराव संभाजी मलगुंडे (इस्लामपूर), महिला राखीव : सत्वशीला उदयसिंह थोरात (बहे) उषा संपतराव पाटील (शेरे) हे पिछाडीवर आहेत.

कारखाना निवडणुकीत संस्थापक पॅनेलची उमेदवारांमध्ये इतर मागास प्रवर्ग राखीवमधून मिलिंद पांडुरंग पाटणकर- कासारशिंरबे, विशेष मागास प्रवर्ग – नितीन शंकर खरात- खरातवाडी हे उमेदवार पिछाडीवर आहेत.

आघाडीवर असलेले उमेदवार –
सहकार पॅनेल
मागासवर्गीय प्रवर्गातून वसंतराव बाबुराव शिंदे (विंग),
भटक्या जाती / जमाती, अविनाश मधुकर खरात (खरातवाडी)

पिछाडीवर असलेले उमेदवार –
रयत पॅनेल
अनुसूचित जाती जमाती राखीवमधील उमेदवार अधिकराव लक्ष्मण भंडारे (टेंभू),
इतर मागास प्रवर्ग राखीव : शंकरराव ज्ञानदेव रणदिवे (कासेगाव),
भटक्या विमुक्त जाती जमाती राखीव: आनंदराव संभाजी मलगुंडे (इस्लामपूर),
महिला राखीव : सत्वशीला उदयसिंह थोरात (बहे) उषा संपतराव पाटील (शेरे)

संस्थापक पॅनेल
इतर मागास प्रवर्ग राखीवमधून मिलिंद पांडुरंग पाटणकर- कासारशिंरबे,
विशेष मागास प्रवर्ग – नितीन शंकर खरात- खरातवाडी

Leave a Comment